गुरुदेव अंत न पहावा मनाचा ।
बोबडा बोल ऐका ना या बाळाचा ।। ध्रु. ।।
गुरुमाऊली असे हे तुमचे बाळ दीनदुबळे ।
तयामध्ये आता आपणच मनोबल एकवटावे ।। १ ।।
हे बाळ सदैव गुंतते व्यक्तीत ।
नका करू विलंब काढण्या त्यातून तयास ।। २ ।।
धडपडे सदैव हे बाळ न्यूनगंड मनी बाळगूनी ।
सळसळे मन तयाचे स्वभावदोष नी अहंकारानी ।। ३ ।।
साधनेत प्रगतीसाठी धडपड करूनी ।
हे बाळ आता गेले आहे पूर्ण थकूनी ।। ४ ।।
भाव नसे तळमळ नसे या बाळाची ।
परि ईश्वरदर्शन व्हावे याच जन्मी ही आस मनीची ।। ५ ।।
शुद्ध पवित्र निर्मळ अंतःकरणासाठी ।
झटेल हे बाळ सदैव तुमच्या चरणांसाठी ।। ६ ।।
असे भक्ती मर्यादित या बाळाची ।
तरी सदैव बसवा तयासी तुमच्या हृदयात ।। ७ ।।
षड्रिपूंच्या बंधनातून मुक्त करावया ।
धावत या गुरुराया धावत या गुरुराया ।। ८ ।।
– कु. गायत्री राजेंद्र जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.३.२०२४)