बिहारचे मंत्री मुकेश साहनी यांच्या वडिलांच्या हत्या प्रकरणी काझिम अन्सारीला अटक !

डावीकडे जितन साहनी आणि काझिम अन्सारी

पाटलीपुत्रा – बिहारचे पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री मुकेश साहनी यांचे वडील जितन साहनी (वय ७० वर्षे) यांची दरभंगा येथील जिराट मोहल्ला, सुपौल बाजार येथील त्यांच्या रहात्या घरी काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. आता या प्रकरणी मारेकरी काझिम अन्सारी याला अटक करण्यात आली आहे. काझिम अन्सारी याने गुन्ह्याची स्वीकृती  दिली आहे.

काझिम अन्सारी याने जितन साहनी यांच्याकडून दीड लाख रुपये व्याजावर घेतले होते. १२ जुलै या दिवशी काझीम अन्सारी त्याचा साथीदार महंमद चेदीसह जितन साहनी यांच्याकडे गेला होता. रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास आरोपी मागील दाराने साहनी यांच्या घरात घुसले. त्यांनी जितन साहनी यांना जागे केले आणि त्यांच्याकडे भूमीच्या कागदपत्रांची मागणी केली. जितन साहनी यांनी अवेळी आलेल्या आरोपींना शिवीगाळ केली. त्यामुळे चिडलेल्या काझिम अन्सारी याने साहनी यांना धारदार चाकूने भोसकले, तर  त्याच्या साथीदाराने जितन साहनी यांचे हात-पाय पकडून ठेवले होते. आरोपींनी जितन साहनी यांची हत्या करून घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी जितन साहनी यांचे पुत्र मुकेश साहनी यांचे त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले.

संपादकीय भूमिका 

हत्या, लूटमार, दंगली इत्यादी गुन्ह्यांमध्ये आढळणारे बहुसंख्य आरोपी हे  मुसलमान असतात. एरव्ही अल्पसंख्य असलेले मुसलमान गुन्हेगारीमध्ये मात्र बहुसंख्य आहेत, हे यावरून लक्षात येते !