Taliban Bans Muharram : अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारकडून मोहरम साजरा करण्यावर निर्बंध !

काबुल – अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारने मोहरम आणि आशुरा हा सण साजरा करण्यावर  निर्बंध आणले आहेत. हेरातसह अनेक प्रांतांमध्ये तालिबानने मोहरमचे ध्वज काढून टाकले आहेत. तालिबानने पारंपरिक १० दिवसांचे उत्सव ३ दिवसांवर आणले असून ते काबुलच्या विशिष्ट भागांत मर्यादित स्वरूपात साजरे करण्यात येणार आहेत. शिया धर्मगुरु, कार्यकर्ते आणि राजकीय व्यक्ती यांनी तालिबानच्या या निर्णयाचा निषेध केला आहे.


काय आहे आशुरा सण ?

जगभरातील मुसलमानांनी १६ जुलैला आशुरा साजरा केला. आशुरा हा दिवस सर्व मुसलमानांकडून साजरा केला जातो; परंतु शिया मुसलमानांसाठी हा शोक व्यक्त करण्याचा विशेष दिवस आहे. आशुरा हा सातव्या शतकातील करबलाच्या (सध्याच्या इराकमधील) लढाईचा वर्धापन दिन आहे, ज्यामध्ये प्रेषित महंमद यांचे नातू हुसेन ‘शहीद’ झाले होते. इस्लामी पंचांगाच्या पहिल्या महिन्यातील मोहरमच्या १० व्या दिवशी आशुरा हा सण सर्व मुसलमानांकडून साजरा केला जातो.

संपादकीय भूमिका 

अफगाणिस्तानसारख्या इस्लामी देशामध्ये मुसलमानांनी काहीही हिंसक कृत्य न करताही तेथे मोहरमवर निर्बंध आणले जातात, तर भारतात मोहरमच्या मिरवणुकींत हिंसाचार होऊनही त्यावर निर्बंध आणले जात नाहीत !