हवेत केला गोळीबार !
इंदूर (मध्यप्रदेश) – येथे पंजाब नॅशनल बँकेवर दिवसाढवळ्या दरोडा घालण्यात आला. चेहरा झाकून आणि रेनकोट घालून आलेल्या दरोडेखोराने बँकेत घुसून हवेत गोळीबार केला. यानंतर त्याने बँकेतील पैसे बॅगेत घालून तेथून पलायन केले. सुमारे ७ लाख रुपयांची लूट करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Indore Bank Robbery : A lone #robber robs a #bank in Indore (Madhya Pradesh) in broad daylight !
Fires shots in the air !
Shame on the police for letting a lone robber get away with robbing a bank !#robbery pic.twitter.com/6kIiMNj66t
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 17, 2024
अतिरिक्त पोलीस आयुक्त अमित सिंह यांनी सांगितले की, आरोपीकडे बंदूक होती. तो बँकेच्या आत आला. आधी गोळीबार करून दहशत पसरवली. त्यानंतर त्याने कॅश काऊंटरवर बसलेल्या महिला कर्मचार्याकडून बॅगेत पैसे भरून घेतले आणि नंतर पळ काढला. त्याच्यासोबत आणखी काही दरोडेखोर असण्याची शक्यता आहे. त्यांची माहिती काढली जात आहे.
संपादकीय भूमिकाएकटा दरोडेखोर बँकेत दरोडा घालून पसार होतो, हे पोलिसांना लज्जास्पद ! |