पुणे येथे गुरुपौर्णिमेच्या कालावधीत विज्ञापनांशी संबंधित सेवा करतांना साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे

‘वर्ष २०२३ च्या गुरुपौर्णिमेच्या काळात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला पुणे जिल्ह्यात विज्ञापनांशी संबंधित सेवा मिळाली. तेव्हा या सेवेच्या माध्यमातून ‘देवाचे कार्य देवच करून घेतो आणि त्याचे श्रेय साधकांना देऊन त्यांना आनंद देतो,’ हे मला शिकायला मिळाले.

सौ. ज्‍योती दाते

१. ‘सेवेचे नियोजन करणे, नियमित आढावा घेणे आणि पाठपुरावा करणे’, यांमुळे सेवा परिपूर्ण होण्यासाठी साहाय्य होणे

गुरुपौर्णिमेच्या कालावधीत प्रसिद्ध होणार्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रत्येक विशेषांकानिमित्त साधकांचा सत्संग आयोजित करून ‘कसे प्रयत्न करू शकतो ? कोणते ध्येय घेऊया ?’, हे साधकांना विचारून घेतले. त्या दृष्टीने साधकांनी उत्स्फूर्तपणे आणि सांघिकभावाने नियोजन केले. परिणामी गुरुपौर्णिमेनिमित्त घेतलेले ध्येय पूर्ण करता आले. ‘चांगले नियोजन करणे, नियमित आढावा घेणे आणि पाठपुरावा करणे’, यांमुळे सेवा परिपूर्ण होण्यासाठी साहाय्य होते’, हे मला शिकायला मिळाले.

२. पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी सत्संगात विज्ञापने मिळवण्याच्या संदर्भात सूत्रे सांगून साधकांना प्रोत्साहन देणे आणि साधकांना अल्प कालावधीत विज्ञापने मिळणे

पुणे येथे प्राधान्याने ‘विज्ञापने मिळवणे’, ही सेवा करणारे साधक अल्प आहेत. मी या वर्षी ‘सर्व साधकांशी मोकळेपणाने बोलून सर्वांचे साहाय्य घ्यायचे’, असा विचार केला. पुणे येथे आठवड्यातून ५ दिवस सर्व साधकांसाठी एक सत्संग होत असे. या सत्संगात प्रत्येक विशेषांकासाठी विज्ञापनांचे ठरवलेले ध्येय पूर्ण करण्याच्या संदर्भात सूत्रे सांगितली जात असत. तेव्हा अशी अनुभूती यायची की, साधक २ – ३ दिवस प्रयत्न करून विज्ञापने मिळवायचे आणि ते ध्येय पूर्ण व्हायचे. पू. (सौ.) मनीषा पाठक सत्संगात सर्व साधकांना प्रोत्साहन देऊन प्रयत्न करून घेत असल्याने हे सर्व अनुभवता आले.

३. ‘सर्व साधक सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे समष्टी रूप असून त्यांना सूत्रे सांगून सामावून घेतले, तर देवाला अपेक्षित असे होते’, याची मला प्रचीती आली.

४. साधकांनी एकमेकांना सेवा आणि साधना यांत साहाय्य केल्याने फलनिष्पत्ती वाढणे

सौ. शारदा हुमनाबादकर, सौ. अर्चना चांदोरकर, सौ. मोहिनी चितळे, सौ. श्वेता तागडे, सौ. स्वाती भोसले आणि सौ. संगीता घोळे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ५८ वर्षे) या साधिकांनी अतिशय तळमळीने आणि मनाने एकरूप होऊन सेवा केली. ‘साधकांनी एकमेकांना सेवा आणि साधना यांत साहाय्य केल्याने अल्प साधकांमध्ये सेवा पूर्ण झाली अन् फलनिष्पत्ती वाढली’, असे माझ्या लक्षात आले.

‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेनेच ही सूत्रे मला शिकायला मिळाली’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’

– सौ. ज्योती दाते (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ६० वर्षे), फोंडा, गोवा. (२३.८.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक