१७ जुलै २०२४ या दिवशी आषाढी एकादशी आहे, त्या निमित्ताने…

सनातनच्या सूक्ष्मज्ञानप्राप्तकर्त्या सुश्री (कु.) मधुरा भिकाजी भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांनी केलेली कविता येथे देत आहोत.

हे विठुराया, तू असे पतित पावन ।
तुझ्या कृपेने धन्य झाले माझे जीवन ।। १ ।।

तुझे सुंदर रूप डोळेभर पाहीन ।
तुझ्या चरणांची सेवा आजीवन करीन ।। २ ।।

तुला पाहून तृप्त होतात हे लोचन ।
तुझ्या नामाने मिळे मला संजीवन ।। ३ ।।

तुझ्या चरणांशी नांदते त्रिभुवन ।
हे भक्तवत्सल, लक्ष्मीनारायण ।। ४ ।।

तुझ्या पवित्र नामाचे करता श्रवण ।
माझ्या चित्तवृत्तीचे होते दमन ।। ५ ।।

तुला लावते भक्तीभावाचे चंदन ।
मन-बुद्धी करते तव चरणी अर्पण ।। ६ ।।

अखंड करते तुझे नामसंकीर्तन ।
अनन्य भावे करते तुला वंदन ।। ७ ।।

संत करतात तुझे भावपूर्ण कीर्तन ।
तुझ्या कीर्तनात जाते मन माझे गुंतून ।। ८ ।।

तुझ्या गुणांचे करूनी स्मरण ।
देहभान विसरून करते तुझे भजन ।। ९ ।।

तुझ्या श्री चरणी करूनी भावपूर्ण नमन ।
या जिवाचे तुझ्या चरणी संपूर्ण समर्पण ।। १० ।।

विठुरायासह वसते पंढरीला माता रुक्मिणी ।
पंढरीची वारी असे भक्तांसाठी पर्वणी ।। ११ ।।

तू वसतो पंढरपूरच्या तीर्थक्षेत्री ।
तुझे गोड रूप वसते वारकर्‍यांच्या नेत्री ।। १२।।

जेव्हा तू मारक रूप करशील धारण ।
अनिष्ट शक्तींचे होईल मग निर्दालन ।। १३ ।।

विठुराया, आता कटेवरील हात द्यावे सोडून ।
आणि उचलावा सनातन धर्माचा गोवर्धन ।। १४ ।।

हीच प्रार्थना, तुज चरणी हे माऊली ।
कृपा करावी आम्हावर, हे विठुमाऊली ।। १५ ।।

– सुश्री (कु.) मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.६.२०२४)

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.