हिंगोली – शहरातील पशूवधगृहात आणल्या जाणार्या १२ जनावरांसह २ वाहने असा एकूण ७.७७ लाख रुपयांचा माल पोलिसांच्या पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी चौघांवर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात १४ जुलैच्या रात्री गुन्हा नोंद झाला आहे.
वाशिमकडून काही वाहनांमधून अनधिकृतपणे जनावरांची वाहतूक केली जात होती. त्यावरून पोलिसांच्या पथकाने रेल्वे उड्डाणपुलाजवळ एका वाहनाची पडताळणी केली असता त्यात ७ जनावरे आढळून आली. पोलिसांनी आणखी एक पिकअपची पडताळणी केली असता त्यात ५ जनावरे आढळून आली.
या प्रकरणी शेख सलीम शेख गफूर आणि महंमद इजाज महमद जब्बार, शेख वाहीद शेख मुख्तार आणि बबन निरगुड यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.