नियोजनकौशल्य असलेल्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. वर्धिनी वासुदेव गोरल (वय २८ वर्षे) !

आषाढ शुक्ल दशमी (१६.७.२०२४) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्‍या सौ. वर्धिनी वासुदेव गोरल यांचा २८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या समवेत सेवा करणार्‍या सौ. अनुराधा निकम यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सौ. वर्धिनी वासुदेव गोरल यांना २८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

सौ. वर्धिनी गोरल

१. मनमोकळेपणा : ‘मागील दीड वर्षापासून मी सौ. वर्धिनी गोरल हिच्या समवेत सेवा करत आहे. तिच्या बोलण्यात मोकळेपणा आहे. ती एखादा आनंददायी प्रसंग सांगत असतांना तिच्या बोलण्यातून आनंद प्रक्षेपित होतो. सहसाधिकेच्या समवेत एखादी सेवा करतांना झालेल्या मनाच्या संघर्षाविषयी ती मोकळेपणाने सांगते.

सौ. अनुराधा निकम

२. वर्धिनीचे पूर्वनियोजन चांगले असते. ‘ऐन वेळी तातडीच्या सेवा येऊ शकतात’, याबद्दलची तिची जागरूकता शिकण्यासारखी असते.

३. अनेक शब्दांमधून व्यक्त न होणार्‍या भाव-भावना तिचे हास्य आणि डोळे यांतून व्यक्त होतात.

४. वर्धिनी कधीतरी तिच्या आईशी भ्रमणभाषवर बोलते. तेव्हा तिच्या बोलण्यातील ‘प्रेमभाव’, ‘प्रगल्भता’ आणि ‘समोरच्याला आधार देण्याची शैली’ इत्यादी गुण लक्षात येतात.

‘उत्तम कार्यक्षमता, तळमळ, प्रीती आणि सर्वसमावेशकता’, या तिच्यातील दैवी गुणांचा गुरुकार्यासाठी अधिकाधिक उपयोग होऊ दे. तिचे हे गुण आम्हाला आत्मसात् करता येऊ देत’, अशी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कोमल चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. अनुराधा निकम (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ६५ वर्षे), फोंडा, गोवा. (१०.७.२०२४)