कर्नाटक वक्फ बोर्डात ४ कोटी रुपयांचा घोटाळा !

कर्नाटक वक्फ बोर्ड

बेंगळुरू (कर्नाटक) – राज्य वक्फ बोर्डात कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. ४ कोटी रुपये अन्य खात्यात ठेव म्हणून ठेवले होते. ही रक्कम खात्यातून नाहीशी झाल्याचे उघडकीस आले आहे. हाय ग्राऊंड्स पोलीस ठाण्यात बोर्डाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी झुल्फिकारूल्ला याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी वक्फ बोर्डाचे मुख्य लेखाधिकारी मीर अहमद अब्बास यांनी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे.

संपादकीय भूमिका

  • मंदिरांमध्ये घोटाळे होतात, असे सांगत त्यांचे सरकारीकरण करणारे शासनकर्ते आता वक्फ बोर्डाचे सरकारीकरण करणार का ?