|
मंगळुरू (कर्नाटक) – दक्षिण कन्नड जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक असलेले पुण्यक्षेत्र कद्रि मंजुनाथ मंदिर सकाळी उघडताच दुचाकी घेऊन मंदिराच्या प्रांगणात घुसून सुधाकर आचार्य या खासगी रुग्णालयातील सुरक्षा कर्मचार्याने गोंधळ घातला. त्याने येथील दरवाजाला लाथ मारली, तसेच त्याला जाब विचारणार्या पुजार्यावरही आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही, तर देवाच्या मूर्तीच्या हातातील तलावार काढून त्याने गोंधळ घातला. या वेळी मंदिरात असलेल्या भाविकांनी त्याला पकडून चोपले आणि पोलिसांच्या कह्यात दिले.