Supreme Court Sentences : जीन्स घालून आलेल्या अधिवक्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले !

योग्य पोशाखातच येण्याविषयी दिली समज !

नवी देहली – अधिवक्त्यांनी योग्य पोशाखातच न्यायालयात आले पाहिजे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने एका अधिवक्त्याला दिली. गुवाहाटी उच्च न्यायालयात एक वरिष्ठ अधिवक्ता जीन्स घालून आल्याने न्यायमूर्तींनी पोलिसांकरवी त्यांना न्यायालयाच्या बाहेर काढले, तसेच त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई केली. या प्रकरणी संबंधित अधिवक्ते बी.के. महाजन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका प्रविष्ट केली.

याचिकेत त्यांनी म्हटले की, मी जीन्स घातल्यावरून न्यायालयाची क्षमा मागितली होती, तरी मला पोलिसांकरवी बाहेर का काढण्यात आले ? या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने अधिवक्ते महाजन यांनाच खडे बोल सुनावले. न्यायालयाने म्हटले की, अधिवक्त्यांनी योग्य पोशाखामध्येच न्यायालयात आले पाहिजे.

संपादकीय भूमिका 

मंदिरातील वस्त्रसंहितेला (पोषाखाच्या संदर्भातील नियमांना) विरोध करणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?