मुंबई, १० जुलै (वार्ता.) – मराठवाडा आणि विदर्भ येथे झालेल्या भूकंपात जरी जीवित किंवा वित्त हानी झालेली नसली, तरी भूकंपाची राज्यशासनाने नोंद घेतली आहे. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, प्रशासकीय यंत्रणा यांना सतर्क रहाण्याचे आणि नागरिकांना आवश्यक साहाय्य तातडीने उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.