‘१९.१.२०२४ ते २१.१.२०२४ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘साधकत्ववृद्धी शिबिरा’च्या वेळी श्री. चेतन राजहंस विषय समजावत असतांना मला पुढील अनुभूती आल्या.
१. श्री. चेतन राजहंस यांनी सांगितलेली सूत्रे माझ्या हृदयात पुष्कळ खोलवर जात होती आणि माझा भाव सतत जागृत होत होता.
२. ‘श्री. चेतनदादा बोलत नसून गुरुमाऊलीच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) सूत्रे सांगत आहेत’, असे मला वाटले.
३. श्री. चेतनदादांनी फळ्यावर लिहिलेल्या हस्ताक्षरातही मी गुरुमाऊलींचेच हस्ताक्षर अनुभवत होते.’
– सौ. शुभांगी संजय मुळ्ये (वय ५५ वर्षे), रत्नागिरी (२१.१.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |