लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – हाथरस येथील भोलेबाबा यांच्या सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेच्या ७ दिवसांनंतर उत्तरप्रदेश सरकारने उपजिल्हाधिकारी, विभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्यासह एकूण ६ अधिकार्यांवर कारवाई केली आहे. त्यांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा ठपका ठेवत सरकारने त्यांना निलंबित केले आहे. घटनेचे अन्वेषण करण्यासाठी बनवण्यात आलेल्या विशेष अन्वेषण पथकाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ९०० पानांचा अहवाल सादर केला आहे.
अहवालातील ९ विशिष्ट सूत्रांचा उल्लेख करण्यात आला असून त्यात भोलेबाबा यांचे नाव नाही. आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली. स्थानिक पोलीस आणि प्रशासन यांच्या अधिकार्यांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहिले नाही. अहवालात म्हटले आहे की, अपघातात कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
संपादकीय भूमिकाचेंगराचेंगरीत १३० लोक मृत्यूमुखी पडल्यामुळे संबंधित उत्तरदायींना कठोर शिक्षाच झाली पाहिजे ! |