महाराष्‍ट्रात प्‍लास्‍टिकपासून बनवलेले तांदूळ नाहीत ! – छगन भुजबळ, अन्‍न आणि पुरवठा मंत्री

श्री. छगन भुजबळ

मुंबई, १० जुलै (वार्ता.) – प्‍लास्‍टिकचे मूल्‍य तांदुळाहून अधिक आहे. त्‍यामुळे प्‍लास्‍टिकचे तांदूळ बनवून ते विकण्‍याचा प्रश्‍नच येत नाही. तांदुळामध्‍ये काही जीवनसत्त्वे मिसळण्‍यासाठी प्रक्रिया केल्‍यामुळे असे तांदूळ आले आहेत. याविषयी सरकारने संपूर्ण माहिती घेतली आहे. राज्‍यात प्‍लास्‍टिकपासून बनवलेले तांदूळ नाहीत, अशी माहिती अन्‍न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत दिली. अन्‍न आणि पुरवठा विभागाविषयीच्‍या एका तारांकित प्रश्‍नावर उत्तर देतांना छगन भुजबळ यांनी वरील माहिती दिली.