मुसलमान व्यापार्यांचा ‘नाम जिहाद’ !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – कावड यात्रेत मुसलमानांनी त्यांच्या दुकानांना हिंदूंच्या देवतांचे नाव दिल्यास अनेक वाद निर्माण होऊ शकतात आणि त्यावर अनेकांचा आक्षेपही असू शकतो. तुम्हाला हवे ते नाव ठेवा, यावर आमचा आक्षेप नाही; पण देवतांची नावे वापरू नका, असे आवाहन उत्तरप्रदेशचे मंत्री कपिल देव अग्रवाल यांनी काही दिवसांपूर्वीच एका बैठकीत केले होते. या संदर्भात ‘झी न्यूज’ या वृत्तवाहिनीने उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश राज्यांत एक शोधमोहीम चालवून अशा दुकाने आणि ढाबे यांची माहिती उघड केली आहे या दुकानांना हिंदूंच्या देवतांचे नाव देण्यात आले आहे, तरी त्यांचे मालक मुसलमान आहेत.
Several cases of Mu$|!m$ disguising their shops and roadside restaurants by naming them after Hindu deities in #UttarPradesh and #Uttarakhand.
👉 Mu$|!m businessmen’s deceitful ‘Naam Jih#d’.
👉 Mu$|!m$ are very well aware that devout Hindus on #KanwarYatra or pilgrimage would… pic.twitter.com/8iYmSoZWa3
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 9, 2024
१. उत्तराखंडमध्ये ‘वैष्णोदेवी’ असे नाव असलेली अनेक दुकाने आणि ढाबे या वृत्तवाहिनीच्या पत्रकारांना सापडली; मात्र यांतील बहुतांश दुकाने आणि ढाबे यांचे मालक मुसलमान आहेत.
२. ढाब्यांच्या नावांमुळे कावड यात्रेकरू तेथे अल्पाहार किंवा भोजन करण्यासाठी जातात. येथे कावड यात्रेकरूंसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली असली, तरी पदार्थ बनवणारे कर्मचारी मुसलमान असतात; मात्र हे कावड यात्रेकरूंना ठाऊक नसते.
३. जेव्हा ‘झी न्यूज’चे पथक बिजनौरच्या डेहराडून-नैनिताल महामार्गावर पोचले, तेव्हा त्यांना असे २० हून अधिक ढाबे सापडले, ज्यांना हिंदूंच्या देवतांचे नाव देण्यात आले आहे; मात्र ते मुसलमान चालवत आहेत. यांमध्ये ‘श्री खाटू श्याम ढाबा’, ‘नीलकंठ फॅमिली रेस्टॉरंट’, ‘हिमालय ढाबा’ आणि ‘शिव ढाबा’ या नावाने चालवण्यात येणार्या ढाब्यांचा समावेश आहे.
४. उत्तरप्रदेशातील सहारनपूरमध्येही असेच अनेक ढाबे हिंदूंच्या देवतांच्या नावाने चालत असल्याचे आढळून आले. त्यांपैकी एक ‘जनता वैष्णो ढाबा’ होता आणि त्याचा मालक मुसलमान होता. वृत्तवाहिनीच्या पत्रकारांनी ढाब्याचा मालक महंमद अनस सिद्दीकी याच्याशी चर्चा केली असता त्याने, ‘गेल्या १५ वर्षांत मला या नावाची कोणतीही अडचण आली नाही’, असा दावा केला. या ढाब्याच्या ठिकाणी कावड यात्रेकरूंसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
५. उत्तरप्रदेशातील बरेली येथे मुसलमान व्यापारी हिंदूंच्या देवतेच्या नावाने दुकान चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. हिंदु धर्मातील लोकांना त्यांच्या दुकानातून मिठाई खरेदी करता यावी; म्हणून या दुकानाचे नाव ‘चौधरी स्वीट्स’ ठेवले आहे.
केवळ चौधरीच नाही, तर बरेलीमध्ये अशी अनेक दुकाने आहेत, जी हिंदूंच्या नावाने चालू आहेत. हे ढाबे आणि दुकाने अनेक वर्षांपासून हिंदूंच्या नावाने चालू असून नाव काहीही असले, तरी व्यवसाय चालवणे हाच एकमेव उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
संपादकीय भूमिका
|