झोपेची गोळी न दिल्याने औषध विक्रेत्याला तरुणांकडून रॉडने मारहाण

डोंबिवली येथील घटना !

प्रतिकात्मक छायाचित्र

डोंबिवली – येथील खोणी पलावा या इमारतीमधील औषध विक्रेत्याने झोपेची गोळी न दिल्याने काही तरुणांनी त्याला बेदम मारहाण केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात चित्रीत झाली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. ‘मारहाण करणार्‍या आरोपींना तात्काळ अटक करून अशा प्रवृत्तीवर वचक बसवावा’, अशी मागणी ‘डोंबिवली मेडिकल केमिस्ट असोसिएशन’च्या वतीने करण्यात आली आहे. आधुनिक वैद्यांची चिठ्ठी नसल्याने विक्रेत्याने गोळी देण्यास नकार दिला होता. त्याचा राग आल्याने तरुणाने त्याच्या साथीदारांना बोलावले. नंतर त्या टोळीने कर्मचार्‍यासमवेत वाद घातला आणि त्याला दुकानाबाहेर खेचत आणून रॉडने मारहाण केली.

संपादकीय 

कायद्याचे उल्लंघन करणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी !