Afghanistan Refugees : पाकिस्‍तान आणि इराण यांनी त्‍यांच्‍या देशांतून १२ सहस्र अफगाणी निर्वासितांना हाकलले !

इस्‍लामाबाद (पाकिस्‍तान) – इराण आणि पाकिस्‍तान यांनी अलीकडेच जवळपास १२ सहस्र अफगाणी स्‍थलांतरितांना त्‍यांच्‍या देशांतून परत पाठवले आहे. अफगाणिस्‍तानच्‍या मंत्रालयाने सांगितले की, सर्व अफगाणी लोक अफगाणिस्‍तानात परतले आहेत. दुसरीकडे सौदी अरेबिया आणि संयुक्‍त अरब अमिरात या देशांत पाकिस्‍तानी आणि बांगलादेशी मुसलमानांनाही अशा प्रकारे नेहमीच बाहेर काढले जाते.

संपादकीय भूमिका

  • इस्‍लामी देशांतून दुसर्‍या इस्‍लामी देशातील निर्वासित मुसलमानांना हाकलून लावले जाते. याविषयी एकही इस्‍लामी देश तोंड उघडत नाही; मात्र भारतातून रोहिंग्‍या आणि बांगलादेशी घुसखोर मुसलमानांना बाहेर काढण्‍याची कुणी मागणी जरी केली, तरी देशातील सर्व ढोंगी निधर्मीवादी राजकीय पक्ष आणि मुसलमान नेते रस्‍त्‍यावर येऊन याला विरोध करतात, हे लक्षात घ्‍या !
  • ‘भारतातून मुसलमानांना हाकलून लावले जाईल’, असा खोटा प्रचार करत नागरिकत्‍व सुधारणा कायद्याला (‘सीएए’ला) विरोध करणारे आता का गप्‍प आहेत ?
  • पॅलेस्‍टाईनवरून इस्रायलचा विरोध करणारे आता कुठे आहेत ?