Early Moon : भारत आणि विदेशात ‘हनीमून’ऐवजी ‘अर्लीमून’चा प्रकार होत आहे प्रसिद्ध !

वॉशिंग्‍टन (अमेरिका) – विवाहानंतर हनीमूनला जाणार्‍यांमध्‍ये आता नवीन प्रकार समोर आला आहे. यात विवाहपूर्वीच म्‍हणजे साखरपुडा झाल्‍यानंतर ‘अर्लीमून ट्रीप’ म्‍हणून सहलीला जातात. याद्वारे दोघांमधील नाते अधिक दृढ केले जाते, असे म्‍हटले जात आहे.

या अर्लीमूनसाठी हॉटेल्‍सही विशेष पॅकेज देत आहेत. भारताखेरीज अमेरिका, तसेच युरोपीय देशांमध्‍येही हा प्रकार वाढत आहे. यामुळे हॉटेल्‍सचा व्‍यवसाय वाढत आहे.

संपादकीय भूमिका

दिवसेंदिवस संस्‍कृतीचे पालन करण्‍याऐवजी समाज अधोगतीला कसा जात आहे, त्‍याचेच हे दर्शक आहे ! अशा विकृतींमुळेच विवाह टिकण्‍याऐवजी घटस्‍फोटांचे प्रमाण वाढत आहेत !