सद्गुरूंनी जगातील सर्व लोभविषय आपल्या अंतरंगात रिचवून टाकलेले असतात. ते स्थलातीत, कालातीत आणि विचारातीत असतात. ते स्वतःच आत्मवस्तू असतात. मीच सगळीकडे आणि माझेच सगळे, ही त्यांची भावना असते; म्हणून त्यांचे ‘मी’चे स्फुरणे वेगळे आणि प्रभावी असते. ते तृप्त असते. तेथे अतृप्तीचा वावर असत नाही. द्वैत मावळलेले असते.
– प्रा. गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे, कोल्हापूर (‘गुरुबोध’)