ज्येष्ठ अमावास्या (५.७.२०२४) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्या सौ. संगीता श्रीकांत चौधरी यांचा ४४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
सौ. संगीता श्रीकांत चौधरी यांना ४४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. कर्करोगाचे निदान झाल्यावरही स्थिर असणे
‘मागील ३ वर्षांपासून मी आणि सौ. संगीता चौधरी रामनाथी आश्रमात एका खोलीत रहात आहोत. ताईला ‘थॉयरॉईड’चा (कंठग्रंथीचा) त्रास होता. डिसेंबर २०२३ मध्ये वैद्यकीय चाचणी केल्यावर तिला थॉयरॉईड ग्रंथीचा कर्करोग असल्याचे निदान झाले. त्या वेळी ती स्थिर होती.
२. कर्करोगाचे निदान होण्यापूर्वीही तिला अन्य शारीरिक त्रास होत होते, तरीही तिने सवलत न घेता नियोजनानुसार सेवा केली.
३. तिला जेवणात बरेच पथ्य आहे; पण त्याविषयी ती कुणाकडे गार्हाणे करत नाही.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा
तिला थॉयराईडचे शस्त्रकर्म करण्यासाठी रुग्णालयात भरती व्हायचे होते. तेव्हा तिच्या समवेत तिचे यजमान श्री. श्रीकांत होते. तिला कसलाही ताण आला नाही किंवा भीती वाटली नाही. शस्त्रकर्म झाल्यानंतर ती रेडिएशनसाठी (टीप) एकटीच रुग्णालयात गेली. ताई परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धेच्या बळावर या कठीण प्रसंगांना खंबीरपणे सामोरी गेली.
टीप – रेडिएशन : कर्करोगावरील उपचारप्रणाली.’
– कु. कौमुदी जेवळीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.३.२०२४)