सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी एका सत्संगात ‘साधकांनी स्वतःची चूक सांगणे आणि चूक स्वीकारणे’ या संदर्भात सांगितलेली काही सूत्रे येथे दिली आहेत.
१. सत्ययुग
साधक (मनुष्य) स्वतःकडून झालेली चूक सांगतो. तो चूक मनापासून स्वीकारतो. तेव्हा साधक सत्ययुग अनुभवत असतो.
२. त्रेतायुग
रामराज्यात साधकाला स्वतःच्या कर्तव्याची जाणीव असते.
३. द्वापरयुग
इतरांना साधकाला (मनुष्याला) चूक सांगावी लागते. तेव्हा साधक द्वापरयुग अनुभवत असतो.
४. कलियुग
इतरांना साधकाला (मनुष्याला) चूक दाखवून द्यावी लागते, तरीही ती चूक त्याला स्वीकारता येत नाही. त्याला केवळ आपल्या अधिकाराचीच जाणीव असते. ‘त्याला स्वतःच्या चुकीची जाणीव होऊन पश्चात्ताप होणे’, ही तर फार दूरची गोष्ट असते. त्या वेळी तो कलियुगातील स्थिती अनुभवत असतो.’
संग्राहक – कु. मनीषा माहुर, मथुरा सेवाकेंद्र (१३.३.२०२४)