‘दासनवमीला पू. (सौ.) मनीषाताईंचा वाढदिवस होता. त्या दिवशी सौ. अर्चनाताईंनी स्वतःला पुष्कळ शारीरिक त्रास असतांनाही पू. मनीषाताईंसाठी शुभेच्छापत्र बनवले. तेव्हा मला शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. सौ. अर्चनाताईंचा संतांप्रती उत्कट भाव आहे. त्यांच्यात संतांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याची तळमळ आहे.
२. शुभेच्छापत्रातील लिखाण आणि संरचना ताईंनी स्वतः केली होती; पण त्यामध्ये स्वतःचे नाव न लिहिता ‘पुणे जिल्ह्यातील सर्व साधक’, असे लिहिले. यातून ताईंचा अहं अल्प असल्याचे लक्षात येते.’
– सौ. स्नेहल पाटील (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सिंहगड रस्ता, पुणे. (७.३.२०२४)