Video Tajmool beat Up Couple : बंगालमध्‍ये तृणमूल काँग्रेसचा नेता ताजमूल याचा एका जोडप्‍याला मारहाण करतांनाचा दुसरा व्‍हिडिओ प्रसारित

कोलकाता (बंगाल) – बंगालचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी एक्‍सवर एक व्‍हिडिओ प्रसारित केला आहे. हा व्‍हिडिओ १६ जून २०२४ चा असल्‍याचे त्‍यांनी सांगितले आहे. यात रात्रीच्‍या वेळेत एका महिलेला दोरीने बांधून फिरवण्‍यात येत आहे. या महिलेसमवेत एका पुरुषाचे कपडे काढून त्‍यालाही दोरी बांधून फिरवले जात आहे. या वेळी दोघांनाही काठीने मारहाण करण्‍यात येत आहे. यावर शुभेंदू अधिकारी यांनी लिहिले की, ‘रस्‍त्‍यावरील न्‍यायालयाचा दुसरा भाग. यामध्‍ये तृणमूल काँग्रेसचा नेता ताजमुल उपाख्‍य  जेसीबी न्‍यायाधीश आणि जल्लाद (फाशीची शिक्षा कार्यान्‍वित करणारी व्‍यक्‍ती) यांची भूमिका बजावत आहे. ममता बॅनर्जी यांच्‍या बंगालमध्‍ये आणखी एक दिवस, जिथे ‘इस्‍लामी राष्‍ट्रा’च्‍या परंपरा स्‍वैरपणे पाळल्‍या जातात.’

अधिकारी यांनी या घटनेला शरीयत कायद्यानुसार देण्‍यात येणारी शिक्षा म्‍हटले आहे. काही दिवसांपूर्वी ताजमूल याचा एक व्‍हिडिओ प्रसारित झाला होता त्‍यात त्‍याने विवाहबाह्य संबंध ठेवणार्‍या एका जोडप्‍याला मारहाण केली होती. त्‍याच ताजमूलचा हा दुसरा व्‍हिडिओ आहे.

संपादकीय भूमिका

बंगालमध्‍ये तृणमूल काँग्रेसचे सरकार म्‍हणजे इस्‍लामी राजवट झाली असून आता लवकरच त्‍याचा बांगलादेश झाल्‍यास आश्‍चर्य वाटू नये !