‘ज्येष्ठ कृष्ण द्वादशी (३.७.२०२४) या दिवशी कु. मधुरा गोखले हिचा २५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. मधुरा गोखले हिला २५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. ‘कु. मधुरा नेहमी आनंदी असते.
२. मधुराचा स्वभाव अतिशय मनमोकळा आहे.
३. आश्रमाविषयी ओढ
मधुरा मागील ५ वर्षांपासून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रहात आहे. तिला आश्रमातील सहसाधिकांविषयी पुष्कळ प्रेम वाटते. ती घरी आल्यावर नेहमी आश्रमाचेच गुणवर्णन करत असते आणि सहसाधिकांचे कौतुक करत असते. ती घरी आली, तरी मनाने आश्रमातच असते. तिला आश्रमात परत जाण्याची ओढ लागलेली असते.
४. सेवेची तळमळ
मधुरा सुट्टीसाठी घरी आल्यावरही प्रतिदिन ४ – ५ घंटे सेवा करते.
५. संत आणि गुरु यांच्याप्रती असलेला भाव
अ. मधुरा सनातनचे ११ वे (समष्टी) संत पू. संदीप आळशी यांनी सांगितल्याप्रमाणे साधनेचे चांगले प्रयत्न करत आहे. याविषयी ती म्हणते, ‘‘पू. संदीपदादांनी सांगितले, म्हणजे त्यांचा संकल्पच होतो. त्यामुळे माझ्याकडून साधनेचे प्रयत्न होतात.’’
आ. काही वेळा ती पू. संदीपदादांकडे तिच्या सेवेतील अडचणी मांडते आणि ते सांगतील, तसे त्यांचे आज्ञापालन करते.
इ. ‘पू. संदीपदादा म्हणजे, गुरुदेवच आहेत’, असा तिचा भाव आहे.
ई. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर तिची पुष्कळ श्रद्धा आहे. ती त्यांनी सांगितलेल्या सूत्रांचे १०० टक्के आज्ञापालन करण्याचा प्रयत्न करते.
‘हे गुरुदेवा, ‘मधुराची लवकर आध्यात्मिक प्रगती होवो’, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.’
– सौ. मेधा गोखले (मधुराची आई), लांजा, जिल्हा रत्नागिरी. (१७.५.२०२४)