भारतीय संस्कृतीतील राष्ट्रजीवन !

पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व, सुसंघटित जनसमुदाय म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्रीयत्वाची भावना, तिच्याशी निगडित घटक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भूमिकेतून ‘हिंदु’ कोण ? सुसंस्कृत समाजातील श्रेष्ठ गुण, चारही वर्णांतील लोक असलेल्या समाजाचे महत्त्व आणि सिंध प्रांतातील महाभयंकर आक्रमण’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.   (लेखांक १४)

या पूर्वीचा लेख आपण येथे वाचू शकता  https://sanatanprabhat.org/marathi/808069.html

प्रकरण ४

१०. महापराक्रमी पृथ्वीराज चौहान राजाचे शौर्य आणि त्याचा शिरच्छेद !

भारताचार्य सु.ग. शेवडे

सुमारे पावणेदोनशे वर्षांनी पुन्हा गझनीच्याच सुलतान महंमद घोरी याची स्वारी झाली. पृथ्वीराज चौहान या महापराक्रमी राजपूत राजाने त्याला पराभूत करून अटक केली. पृथ्वीराजाला शरण येऊन महंमदाने जीवदान मागितले, तेव्हा उदार मनाच्या त्या हिंदु सम्राटाने त्याला जीवदान देऊन सोडून दिले. पुढे त्याच घोरीने पृथ्वीराजावर मोठे आक्रमण करून त्याला अटक केली. प्रथम त्याचे डोळे फोडले आणि त्याला जेरबंद करून गझनीला नेले. त्या वेळी चाँदवरदाई हा त्याचा भाट त्याच्या सेवेला तेथे गेला. भाट चारणांना सामान्यतः सर्वत्र मुभा असे. महंमद घोरीने पृथ्वीराजाला ठार मारण्याचे ठरवले. तेव्हा चाँद भाटाने सुलतानाला पृथ्वीराजाच्या शब्दवेधी धनुर्विद्या कौशल्याचा नमुना पहाण्याची विनंती केली. सुलतानाने दरबार भरवला आणि दूरवर २१ मोठे तवे टांगण्यात आले होते. एकेकावर नाद करण्यात येई आणि दृष्टीहीन पृथ्वीराज त्यावर बरोबर नेम धरून बाण मारत असे. प्रत्येक वेळी सुलतान ‘वाहवा !’, ‘शाब्बास !’, असे शब्द उच्चारत असे. त्या शब्दांच्या अनुरोधाने पृथ्वीराजाने एक बाण सोडला. त्याने महंमद घोरीचा वेध घेतला. आपल्या राष्ट्रावरील अत्याचाराचा त्याने सूड घेतला आणि तात्काळ चाँदवरदाईने आपली तलवार अशा खुबीने फिरवली की, पृथ्वीराज आणि त्याचा स्वतःचा शिरच्छेद झाला.

१० अ. पृथ्वीराजाच्या समाधीची होणारी विटंबना : पुढे त्या पृथ्वीराजाचा देह महंमद घोरीच्या कबरीच्या इमारतीच्या पायर्‍यांमध्ये पुरला गेला. आज त्या जागेवर पाय ठेवूनच लोक खाली उतरतात. गेली ८०० वर्षे पृथ्वीराजाच्या समाधीची अशी विटंबना चालू आहे; पण इथे कुणाला हे विशेष ठाऊक नाही आणि त्याची लाजही वाटत नाही.

११. मुसलमानांच्या आक्रमणाचे षड्यंत्र !

या देशावर झालेल्या प्रत्येक मुसलमानी आक्रमणात मंदिरे उद्ध्वस्त करणे, देवतांच्या मूर्ती फोडणे, घराघरात शिरून कत्तली करणे, तरुण स्त्रियांवर बलात्कार करणे आणि लहान अर्भकांनाही सपासप कापून काढणे हा कार्यक्रम ठरलेला असायचा. गावेच्या गावे बाटवणे हा पुढील कार्यक्रम !

१२. हिंदूंच्या शुद्धतेच्या अतिरेकी घातकी कल्पना राष्ट्रीय पराभवास कारणीभूत !

हिंदूंच्या शुद्धतेच्या अतिरेकी कल्पना यासंदर्भात घातकी ठरल्या आहेत. तोंडात गोमांस कोंबले की, हिंदु मुसलमान व्हायचा. ख्रिस्त्यांनीही हाच मार्ग अवलंबला होता. गोव्यात आणि इतरत्रही विहिरीत पावाचा तुकडा किंवा गोमांस टाकून तसे पाणी पिणार्‍यांना ‘बाटले रे बाटले’ म्हणून लोकांनी म्हणावे आणि आमच्याही लोकांनी त्यांना वाळीत टाकावे ! हा जरी आमच्या अत्यंत विशुद्ध जीवनप्रणालीचा भाग असला, तरी तो आमच्या राष्ट्रीय पराभवाला कारणीभूत ठरला, हे नाकारता येणार नाही.

– भारताचार्य, धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.

(साभार: ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)

या पुढील लेख वाचण्याकरिता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/810213.html