Rishi Sunak : मी हिंदु असल्याचा आणि श्रीमद्भगवद्गीतेवर हात ठेवून खासदारकीची शपथ घेतल्याचा मला अभिमान !

  • ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे विधान !

  • निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर श्री स्वामीनारायण मंदिरला दिली भेट !

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक व त्यांच्या पत्नी अक्षता

लंडन (ब्रिटन) – मी एक हिंदु आहे असून तुमच्या सर्वांप्रमाणेच मला माझ्या (हिंदु धर्मावरील) विश्‍वासातून प्रेरणा अन् दिलासा मिळतो. मी श्रीमद्भगवद्गीतेवर हात ठेवून खासदारकीची शपथ घेतल्याचा मला अभिमान आहे, असे विधान ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी येथील श्री स्वामीनारायण मंदिराला भेट दिल्यानंतर केले. या वेळी त्यांच्या पत्नी अक्षता याही त्यांच्या समवेत होत्या. ब्रिटनमध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर सुनक यांनी मंदिराला भेट देऊन वरील विधान केले.

पंतप्रधान ऋषी सुनक पुढे म्हणाले की, आपली श्रद्धा आपल्याला आपले कर्तव्य करण्यास शिकवते. जो कुणी ते निष्ठेने करत राहील त्याने त्याच्या परिणामांविषयी घाबरू नये. माझ्या अंतःप्रेरणेने मला हेच स्वीकारायला शिकवले आहे. मी माझे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो.

संपादकीय भूमिका

ऋषी सुनक यांचे स्वतःच्या धर्माप्रतीचे प्रेम अभिनंदनीय असले, तरी ते ज्या पदावर बसले आहेत, त्या माध्यमातून त्यांनी स्वधर्म आणि धर्मबांधव यांच्यासाठी काही केले आहे का ? त्यांच्या जागी ख्रिस्ती किंवा मुसलमान असता, तर त्याने त्याच्या धर्मासाठी शक्य तेवढे केले असते !