जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी मागवली विशेष छत्री !

संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी मागवलेली विशेष छत्री

पुणे – जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी यंदा चेन्नईहून विशेष छत्री मागवली आहे. ही छत्री आकर्षक कलाकुसर असलेली, विणकाम आणि हस्तकला केलेली आहे. चेन्नई येथे ही छत्री सिद्ध करवून घेण्यात आली आहे. छत्रीचे कापड वेलवेटचे असून त्यावर शंख, चक्र, गरुड, हनुमान यांची चित्रे हस्तकलेने सिद्ध केलेली आहेत. छत्रीच्या आतील भागातील काड्या लोखंडाऐवजी बांबूपासून सिद्ध केलेल्या आहेत.