साधू-संतांनी समाजात जाऊन धर्मप्रसार केल्याने धर्मविरोधी अपप्रचाराला पायबंद बसेल ! – पू. श्री रामबालक दासजी महात्यागी महाराज, संचालक, जामडी पाटेश्वरधाम सेवा संस्थान, छत्तीसगड
विद्याधिराज सभागृह – युगानुयुगे भारतात संत समाजाची मोठी भूमिका राहिली आहे. संत परंपरेने स्वातंत्र्याचा मार्ग समृद्ध केला होता. आताही संतांविना हिंदु राष्ट्राची स्थापना अशक्य आहे. त्यामुळे साधू-संतांनी त्यांचे आश्रम आणि मठ येथे न बसता समाजात जाऊन धर्मप्रसार करणे आवश्यक आहे. पूर्वी संत प्रवास करत होते. त्यामुळे समाज सुदृढ होता. आता तसे होत नसल्यामुळे सामज क्षीण झाला आहे. त्याला परत सुदृढ करण्यासाठी संतांनी समाजात प्रवास केला पाहिजे. त्यामुळे धर्म आणि संत यांच्या विरोधात होणार्या अपप्रचाराला पायबंद बसेल, तसेच नवीन पिढीवर संस्कार होतील, असे मार्गदर्शन छत्तीसगडमधील जामडी पाटेश्वरधाम सेवा संस्थानचे संचालक पू. श्री रामबालक दासजी महात्यागी महाराज यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या तृतीय दिवशी केले. ते ‘धर्मविरोधी शक्तींकडून हिंदूंवर होणारे आघात आणि त्यांवरील उपाय’ या विषयावर बोलत होते.
महात्यागी बालकदासजी महाराज म्हणाले, ‘‘संत समाजाने विशेषत: आदिवासी क्षेत्रांत गेले पाहिजे. आदिवासी धार्मिक असतात. ते श्रद्धाळू असतात. त्यांच्याकडून संतांचा आदर सत्कार केला जातो. आतापर्यंत केवळ मुसलमान आणि ख्रिस्ती समाज यांच्याकडे मतपेढी म्हणून पहाण्यात येत होते. त्यानंतर आता आदिवासी समाजाकडेही मतपेढी म्हणून पाहण्यात येत आहे. त्यासाठी त्यांना हिंदु धर्म, संत आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या विरोधात चिथावण्यात येत आहे. त्यांना ‘ते हिंदू नाहीत’, असे सांगून त्यांना आपल्याच विरोधात उभे करण्यात येत आहे. ही गोष्ट धर्मांतर आणि लव्ह जिहाद यांपेक्षाही भयावह आहे. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आदिवासी समाजाशी सतत संपर्कात असले पाहिजे.
आपल्या आई-बहिणींच्या रक्षणासाठी ‘हिंदु सेवा क्षेत्रां’ची निर्मिती करा ! – वीरेंद्र पांडेय, संस्थापक, शूरवीर उपक्रम
रामनाथी – आज बरेच हिंदू गाव सोडून नोकरी किंवा कामधंद्यानिमित्त शहरात स्थायिक झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांनी त्याच्या कुटुंबियांनाही नेले आहे. शहरात ते एखाद्या सददिनकेमध्ये त्यांची पत्नी, बहिण, लहान मुले यांसह वास्तव्य करतात. घरातील एकटाच कमावता पुरुष नोकरी-धंद्यानिमित्त दिवसभर बाहेर असतो. या कालावधीत घरातील काही दुरुस्तीच्या कामासाठी येणारा तांत्रिक कामगार हा बहुतेककरून मुसलमान असतो. घरात येणारा हा मुसलमान कामगार हळूहळू घरातील सदस्यांशी जवळीक साधतो आणि नंतर एक दिवस तो त्या व्यक्तीची पत्नी किंवा बहिणी यांच्यासोबत अश्लील व्यवहार करणे चालू करतो. धर्मांधांकडून होणारा हा संभाव्य धोका रोखण्यासाठी आणि आपल्या आया-बहिणींच्या रक्षणासाठी हिंदु कारागिरांची फळी निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण हिंदु ‘सर्व्हिस सेक्टर’ (हिंदु सेवा क्षेत्र) निर्माण केला पाहिजे , असे विधान शूरवीर उपक्रमाचे संस्थापक वीरेंद्र पांडेय यांनी येथे बोलतांना केले. ते ‘हिंदु इकोसिस्टीम : शूरवीर उपक्रमाची संकल्पना’ या विषयावर बोलत होते.
वीरेंद्र पांडेय पुढे म्हणाले की, आज समाजातील प्रत्येक सेवा क्षेत्र मुसलमानांच्या कह्यात आहे. या माध्यमातून मुसलमानांनी हलाल अर्थव्यवस्थेप्रमाणेच एक मोठी ‘कॅश अर्थव्यवस्था’ निर्माण केली आहे. हा रोख पैसा जिहाद आणि आतंकवादी कारवाया यांसाठी वापरला जात आहे. या रोखे अर्थव्यवस्थेवर नियंत्रण आणण्यासाठी हिंदूंना कामे द्या. एखादे सेवा क्षेत्र आपल्या हातातून गेले, तर परत ते कधीही आपल्या हातात येणार नाही.
मंदिरांच्या स्वच्छतेच्या माध्यमातून नवीन युवक धर्मकार्याशी जोडले गेले ! – चक्रवर्ती सुलीबेले, संस्थापक अध्यक्ष, युवा ब्रिगेड, कर्नाटक
विद्याधिराज सभागृह – युवकांना आकर्षित करण्यासाठी राष्ट्रप्रेम जागृत करणारे गीत सिद्ध करून हे गीत आम्ही महाविद्यालयांमध्ये लावले. यामुळे अनेक मुले राष्ट्रकार्याशी जोडले गेले आहेत. हिंदु धर्मप्रेमी असलेल्या गावांमध्येही आम्ही अशा प्रकारची गीते लावली. यामुळे हिंदूंमधील संघटन वाढले. कर्नाटकमधील मंदिरांच्या बाजूचे तलाव स्वच्छ करण्याची मोहीम आम्ही हाती घेतली. या अंतर्गत २५० हून अधिक तलावांची स्वच्छता केली. यामुळे मंदिरांत येणार्या भाविकांची श्रद्धा वाढली. पुढच्या टप्प्यात आम्ही नद्यांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली. कर्नाटकमधील ९-१० नद्यांची या अंतर्गत स्वच्छता करण्यात आली.
Few more slides of programs organised by @yuva_brigade to motivate youth and direct them for the cause of Rashtra and Dharma
Vaishvik Hindu Rashtra Mahotsav I Goa
हिन्दू राष्ट्र pic.twitter.com/ItzLtrxc2b
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 26, 2024
नद्यांच्या स्वच्छतेच्या कार्यात स्थानिक हिंदूही सहभागी झाले. नद्यांची स्वच्छता झाल्यावर तेथे आरती चालू करण्यात आली. सद्य:स्थितीत कर्नाटकमधील ५-६ नद्यांच्या ठिकाणी प्रतीवर्षी आरती होत आहे. स्थानिक हिंदूंकडून या नद्यांची स्वच्छता केली जात आहे. यानंतर आम्ही मंदिरांची स्वच्छता चालू केली. मंदिरांच्या स्वच्छतेद्वारे अनेक नवीन युवक धर्मकार्याशी जोडले गेले. हिंदु धर्मावर टीका करणार्या एका नेत्याच्या भागामध्ये आम्ही ‘मै हू हिंदू’ (मी हिंदू आहे) या सभेचे आयोजन केले. या सभेला सहस्रावधी हिंदू एकत्र आले, अशी माहिती कर्नाटकातील युवा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष श्री. चक्रवर्ती सुलीबेले यांनी ‘हिंदुत्वाच्या कार्यात युवकांना आकर्षित कसे करावे ?’ यावर बोलतांना दिली.
हिंदु व्यावसायिकांचे सबलीकरण करण्यासाठी ‘हिंदु इकॉनॉमिक फोरम’ची स्थापना ! – श्री. दीपक राजगोपाल, राष्ट्रीय कोषाधिकारी, विश्व हिंदु परिषद
विद्याधिराज सभागृह – पूर्वीच्या काळी भारत विविध देशांशी व्यापार करत होता. त्यावेळी कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान नसतांना भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न २८ टक्के होते. भारतातील उत्पादने विदेशात विक्री केली जात होती. आज हिंदूंचे अनेक व्यवसाय अन्य पंथियांच्या कह्यात जात आहेत. ते थांबवण्यासाठी विश्व हिंदु परिषदेने ‘हिंदु इकॉनॉमिक फोरम’ची स्थापना केली. या फोरमच्या माध्यमातून हिंदु व्यावसायिकांचे संघटन होऊन त्यांचे सबलीकरण होते. ‘हिंदु इकॉनॉमिक फोरम’ ५६ देशांमध्ये कार्यरत असून आतापर्यंत फोरमच्या १० देशांमध्ये परिषदा पार पडल्या आहेत. त्यात अनेक मोठे उद्योगपती सहभागी झाले आहेत, अशी माहिती विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय कोषाधिकारी श्री. दीपक राजगोपाल यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये तिसर्या दिवशी दिली. ते ‘हिंदु संघटनांमध्ये हिंदुऐक्याची आवश्यकता’ या विषयावर बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘गावात रहाणारे हिंदू लहान व्यवसाय करत असतात. त्यांना पुढे घेऊन गेले पाहिजे. तसेच त्यांच्या व्यवसायांना चालना दिली पाहिजे. फोरमच्या वतीने प्रत्येक उद्योगक्षेत्रात हिंदु गट बनवण्यात आले आहेत. त्यांची महिन्यातून एकदा बैठक होते. या बैठकीच्या माध्यमातून त्यांची व्यावसायिक देवाणघेवाण होते. त्यातून त्यांच्या व्यवसायात पुष्कळ प्रमाणात वृद्धी होते. अशाच प्रकारे अन्य जिल्ह्यांतही व्यावसायिकांचे संघटन करून हिंदूंचे व्यवसाय हिंदूंकडेच कसे राहतील, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. भंगार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उलाढाल होते, हे लक्षात घेऊन फोरमच्या वतीने ‘हिंदू एकॉनॉमिक फोरम स्क्रॅप कमिटी’ बनवण्यात आली आहे. त्या माध्यमातून हिंदु तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांना हा व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देण्यात येते. यासमवेतच ‘रिअल इस्टेट समिती’ बनवण्यात आली आहे.’’