WikiLeaks Founder Julian Assange : ‘विकिलिक्स’चे संस्थापक ज्युलियन असांज यांची कारागृहातून सुटका

‘विकिलिक्स’चे संस्थापक ज्युलियन असांज

लंडन (ब्रिटन) – ‘विकिलिक्स’ संकेतस्थळाचे संस्थापक असणारे ऑस्ट्रेलियाचे नागरिक ज्युलियन असांज यांची ५ वर्षांनंतर २५ जून या दिवशी येथील कारागृहातून मुक्तता करण्यात आली. अमेरिकेत हेरगिरी केल्याच्या आरोपांवरून त्यांना अटक करण्यता आली होती. अमेरिकी सरकारसमवेत झालेल्या कराराचा भाग म्हणून त्यांनी हेरगिरी केल्याची स्वीकृती दिली आहे. यामुळे असांज यांना ६२ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली जाईल, जी त्यांनी आधीच भोगली आहे. करारानंतर लंडन उच्च न्यायालयाने त्यांना जामीन संमत केला.

वर्ष २०१०-११ मध्ये विकिलिक्सच्या खुलाशानंतर अमेरिकेने ज्युलियन असांज यांनी त्यांच्या देशात हेरगिरी केल्याचा आरोप केला होता. त्याने गुप्त धारिका (फाईल) प्रकाशित केली, त्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात आले. असांज यांनी हेरगिरीचे आरोप वेळोवेळी फेटाळले आहेत. गेल्या १३ वर्षांपासून ते कायदेशीर लढाई लढत होते.