सर्वस्वाचा त्याग हाच हिंदु राष्ट्र स्थापनेचा पाया आहे !

‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

द्वादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला अर्थात् ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला उपस्थित असलेल्या सर्व हिंदु राष्ट्रविरांना माझा नमस्कार. या वर्षी हिंदु राष्ट्र अधिवेशनाची तपपूर्ती (१२ वर्षे) होत आहे. या अधिवेशनांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या धर्मनिष्ठ आणि देशभक्त यांच्या संघटनामुळे आज धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र निर्मितीच्या संकल्पशक्तीची स्पंदने वैश्‍विक स्तरावरही जाणवत आहेत. हिंदु राष्ट्र ईश्‍वराच्या इच्छेनुसार योग्य वेळी स्थापन होणार आहे. खरे तर अयोध्येत श्रीरामजन्मभूमीवर श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन सूक्ष्मातून रामराज्याला, म्हणजे हिंदु राष्ट्राला प्रारंभ झालेलाच आहे. आता रामराज्यरूपी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र प्रत्यक्ष साकार होण्यासाठी स्वक्षमतेनुसार तन-मन-धन आणि प्रसंगी सर्वस्वाचा त्याग करण्याची, म्हणजेच सर्वोच्च योगदान देण्याची आवश्यकता आहे. सर्वस्वाचा त्याग हाच हिंदु राष्ट्र स्थापनेचा पाया आहे, हे लक्षात घेऊन धर्मसंस्थापनेचे महान कार्य करा !

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक संपादक, ‘सनातन प्रभातʼ नियतकालिके