साधकांच्या सर्व अडचणी सोडवून त्यांना साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणार्‍या सद्गुरु स्वाती खाडये !

सद्गुरू स्वाती खाड्ये

‘सद्गुरु स्वाती खाडये यांनी बेळगाव जिल्ह्यातील एका साधिकेला साधनेत पुढे जाण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन केले. त्यातील सूत्रे येथे दिली आहेत. 

सौ. आशा कागवाड

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना शरण जाऊन प्रार्थना करणे आणि स्वभावदोषांवर मात करण्यासाठी स्वयंसूचना सत्र वाढवण्यास सद्गुरु स्वाती खाडये यांनी सांगणे

‘पूर्वी मला इतरांकडून अपेक्षा असायच्या. त्यामुळे इतरांचे स्वभावदोष दिसायचे आणि प्रतिक्रियाही यायच्या. माझ्या मनात ‘आपण कुठे न्यून पडतो’, याचा विचार जराही नव्हता. सद्गुरु स्वातीताई आल्यापासून त्यामध्ये थोडा पालट झाला आहे. सद्गुरु ताईंच्या समवेत वैयक्तिक बोलल्यावर त्यांनी ‘मला ताण येणार नाही किंवा मला वाईट वाटणार नाही’, याची काळजी घेऊन प्रेमाने सर्व सांगितले. त्यात ‘माझे स्वभावदोष कोणते आहेत ? माझ्यामध्ये पालट कसे करायला पाहिजेत ? कुटुंबियांकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा असला पाहिजे’, हे सांगितले. ‘अपेक्षा करणे’ या अहंच्या पैलूवर आणि प्रतिक्रिया न येण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगून त्यासाठी प.पू. गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) शरण जाऊन प्रार्थना करण्यास आणि स्वयंसूचना सत्रे वाढवण्यास सांगितले.

२. स्वभावदोष घालवण्यासाठी तळमळीने प्रयत्न केल्यासच गुरुदेवांना आनंद होईल !

‘‘माझ्या पतीकडून मला तीव्र अपेक्षा असून त्यांच्याबद्दल मला प्रतिक्रिया येतात’’, असे मी सद्गुरु ताईंना सांगितले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘ते एक साधक आहेत’’, असे समजून तुम्ही त्यांच्याशी वागा.’’ तुम्ही इतकी वर्षे साधनेत असून सेवा करता; परंतु गुरुदेवांना काय अपेक्षित आहे, ते तुमच्या लक्षात येत नाही. त्यांना साधक मोक्षाला जायला हवा आहे. तुम्ही तुमचे दोष घालवण्यासाठी तळमळीने प्रयत्न करा, तेव्हाच गुरुदेवांना आनंद होईल.

३. गुरुकृपेने सर्व घडत असल्याने साधनेत सातत्य ठेवण्यास सांगणे

माझ्या मनात, ‘मी सेवा करते, मला सेवेला वेळ असतो’, असे विचार असतात. तेव्हा सद्गुरु ताई म्हणाल्या, ‘‘प.पू. गुरुदेवांनी तुमचा हात धरला आहे; म्हणून हे सर्व घडत आहे. प.पू. गुरुदेवांनी वेळोवेळी अडचणीच्या प्रसंगांतून तुम्हाला बाहेर काढले आहे. त्यामुळे सतत सेवा करा आणि साधनेत पुढे पुढे जाण्यासाठी प्रयत्न करा.’’

‘सद्गुरु स्वातीताईंमध्ये सहजता, प्रेमभाव, नेतृत्व घेऊन सेवा करणे, इतरांचा विचार करणे, निर्णयक्षमता  आणि निरीक्षणक्षमता’, असे अनेक गुण आहेत. ‘हे गुण आम्हा सर्व साधकांमध्ये येवोत’, हीच गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना !

‘हे लिखाण प.पू. गुरुदेवांनी माझ्याकडून करून घेतले’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. आशा कागवाड (वय ६० वर्षे), बेळगाव (२०.३.२०२४)