केंद्रीय स्तरावर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याची आवश्यकता !

आजपासून रामनाथी (गोवा) येथे चालू होत असलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या निमित्ताने…

प.पू. यती मां चेतनानंद सरस्वती यांचा परिचय

प.पू. यती मां चेतनानंद सरस्वती या उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथील डासना पिठाच्या महंत आहेत. धर्मांधांच्या खोट्या प्रेमजाळ्यात अडकलेल्या शेकडो हिंदु तरुणींना त्यांनी लव्ह जिहादपासून वाचवले आहे.

१. हिंदु जनजागृती समितीच्या ‘लव्ह जिहाद’ ग्रंथामुळे पश्चिम उत्तरप्रदेशात मोठ्या प्रमाणात प्रबोधन

‘वर्ष २०१२ मध्ये आम्ही ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात पश्चिम उत्तरप्रदेशात संघर्ष करत होतो. त्या वेळी आमच्याकडे ‘लव्ह जिहाद’विषयी कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे आम्ही लोकांना ‘लव्ह जिहाद’विषयी फार काही सांगू शकत नव्हतो. एखाद्या परिवारातील मुलगी घरून निघून गेली आहे, अशी सूचना आमच्याकडे येत होती. आम्ही लोकांकडे जात होतो; पण त्यांना समजावायचे कसे, ही मोठी अडचण आमच्यासमोर होती. ‘लव्ह जिहाद’ हा शब्द केरळ उच्च न्यायालयाखेरीज इतर कोणत्याही ठिकाणी ऐकला किंवा वाचला गेला नव्हता. त्या वेळी उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाचे सरकार असल्याने तेथे ‘लव्ह जिहाद’ शब्द उच्चारणे, हाही एक मोठा गुन्हा होता. पश्चिम उत्तरप्रदेशात बंदुकीच्या धाकाने मुलींना उचलून नेले जात असे. एखादी मुलगी पोलिसांकडे गेली, तर तेथूनही तिला गुंड उचलून नेत असे. मी अशा अनेक मुलींची सुटका केली आहे.

याच कालावधीत हिंदु जनजागृती समितीने ‘लव्ह जिहाद’ ही पुस्तिका प्रकाशित केली. त्यामुळे लव्ह जिहादच्या विरोधात प्रबोधन करण्यासाठी आम्हाला साधन मिळाले. वशीकरण करतांना कशा प्रकारे मन परिवर्तन (माईंड वॉश) केले जाते ? आणि कशा प्रकारे इस्लामिक संकल्पना त्यांच्या मनात ठसवल्या जातात ? हे मुलींना सांगणे आम्हाला या पुस्तकामुळे शक्य झाले. त्यानंतर आम्ही पुष्कळ कार्य केले.

२. जोहार करणार्‍या महाराणी पद्मिनीच्या काळातील परिस्थिती आजही भारतात !

आज ‘द केरला स्टोरी’ चित्रपटामुळे हे लक्षात आले की, गेल्या १०-१२ वर्षांपासून माझा लव्ह जिहादच्या विरोधात चालू असलेला संघर्ष सत्य आणि हिंदु मुलींचे रक्षण यांसाठीच होता. महाराणी पद्मिनीने जोहार केला होता. हा इतिहास आपल्याला माहिती आहे; पण साम्यवादी म्हणतात की, ‘महाराणी पद्मिनी लढूही शकली असती; पण ती लढली नाही.’ ती लढू शकली नसती; कारण ज्या नरपिशाच्यांशी तिचा सामना होणार होता, तशाच नरपिशाच्यांशी आजही आपण लढत आहोत. ते असे नरपिशाच्च आहेत, ज्यांनी स्त्रीच्या मृत्यूनंतरही तिच्या शरिरावर सामूहिक बलात्कार केला. अशा स्थितीत ‘स्वतःचे शरीर शत्रूच्या हाती लागू नये म्हणून जोहार करणे’, हाच एकमेव मार्ग महाराणी पद्मिनीकडे होता. त्यामुळेच तिने अग्नीमध्ये समर्पित केले.

हिंदु जनजागृती समिती प्रकाशित ‘लव्ह जिहाद’ ग्रंथाचे मुखपृष्ठ , सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com  संपर्क : ९३२२३ १५३१७

३. हिंदु मुली धर्मांधांच्या जाळ्यात फसण्यामागील कारणे

ज्या भारत देशात आपण जन्म घेतला आहे, ती देवभूमी आहे. ज्या ठिकाणी ‘रामचरितमानस’ आणि ‘महाभारत’ यांच्या गोष्टी सांगितल्या जातात, सीतामातेच्या अपहरणानंतर लंका जाळली जाते अन् द्रौपदीच्या वस्त्रहरणानंतर स्वत: योगेश्वर श्रीकृष्ण महाभारताचे युद्ध पुकारतात, अशा देवतुल्य भूमीवर हिंदु मुलींचे सतत अपहरण होत आहे. याची काही कारणे आहेत. कोणत्याही संस्कृतीचा विध्वंस करायचा असेल, तिचे आत्मबळ  तोडायचे असेल, तिच्या आत्म्यावर प्रहार करायचा असेल, तिला घायाळ करायचे असेल, तर ते २ प्रकाराने केले जाऊ शकते. ते असे,

अ. एक तर तिचा आध्यात्मिक स्तर तोडायचा, जे काम साम्यवाद्यांनी अतिशय कुशलतेने केले. आपल्या आध्यात्मिक क्षेत्रावर सतत प्रहार करण्यासाठी साम्यवादी उत्तरदायी आहेत.

आ. दुसरा वार इस्लामिक जिहाद्यांनी हिंदु मुलींवर उघडपणे केला. आपण आपल्या मुलींच्या मनात शत्रुत्वाची भावना निर्माण केली नाही. आपण धर्मशिक्षण म्हणून त्यांना देवघरात दिवे लावण्यास शिकवले; परंतु श्लोक, नीती आणि धर्म अर्धवटपणे सांगून आपण स्वतःची हानी केली.

४. केंद्रस्तरावर लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याची आवश्यकता का ?

केंद्रस्तरावर लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याची काय आवश्यकता आहे, हे समजून घेतले पाहिजे. हा एक सर्वसाधारण गुन्हा नाही, जो कोणत्याही स्त्रीच्या विरोधात होत आहे. हा गुन्हा पूर्वनियोजित योजना करून केला जातो, जो सनातन संस्कृतीच्या विरोधात एक मोहीम म्हणून वापरला जात आहे. ज्या वेळी एक मुलगी जिहाद्याकडे जाते, त्या वेळी ती ५ मुलांना जन्म देते आणि नंतर तिची मानवी तस्करी केली जाते, हे आपण ‘द केरला स्टोरी’मध्ये पाहिले आहे. विदेशातील ‘इसिस’ या जिहादी संघटनेकडे ती एखाद्या लैंगिक गुलामासारखी हस्तांतरित केली जाते. मुलांना जन्म देणार्‍या मुलींची संख्याही पुष्कळ आहे. ज्या वेळी ती ४-५ मुलांना जन्म देते, त्या वेळी तिला घराबाहेर हाकलून दिले जाते आणि मग तिच्याकडे कोणताच मार्ग उरत नाही.

जे लोक सतत या क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांना प्रसारमाध्यमांतून वारंवार काही प्रश्न केले जातात. कुणी आपल्याला म्हटले की, ‘लव्ह’ आणि ‘जिहाद’ हे दोन निराळे शब्द आहेत. त्यावर मला एवढेच सांगायचे की, ‘लव्ह’ हा इंग्रजी शब्द आहे आणि ‘जिहाद’ हा उर्दू शब्द आहे. प्रेमासाठी जोपर्यंत मुलगी सिद्ध होत नाही, जोपर्यंत ती आपल्या जाळ्यात अडकत नाही, जोपर्यंत ती जिहाद्यांची शिकार पूर्णत: होत नाही, जोपर्यंत ती आपल्या सनातन परंपरा आणि परिवार यांच्या विरोधात उभी रहात नाही, तोपर्यंत प्रेम असते. ज्या दिवशी ती जिहाद्याच्या जाळ्यात पूर्णतः अडकते, त्या दिवसापासून तिचे शोषण चालू होते आणि तिच्यावर ‘इस्लामिक जिहाद’ आरंभ होतो. त्यानंतर तिची अत्यंत दुर्दशा होते. अशा मुलींना अतिशय त्रासदायक स्थितीतून जावे लागते. आज ९ राज्यांमध्ये (काश्मीर, लडाख, पंजाब, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, मेघालय, मणीपूर आणि लक्षद्वीप या राज्यांमध्ये) हिंदू अल्पसंख्यांक आहेत.

हरियाणाच्या निकिता तोमर हिची भर रस्त्यावर गोळी मारून हत्या झाली होती. श्रद्धा नावाच्या मुलीचे ३५ तुकडे केले गेले. त्यानंतर साक्षीचे प्रकरण सर्वांसमोर आहे. एक दोन वेळेला चाकूने वार केल्यावर कोणतीही मुलगी दगावेल; परंतु चाकूने ३६ वेळेला वार करून ६ वेळेला तिच्या चेहर्‍याला दगडाने ठेचून मारणे, ही गोष्ट विकृती आहे. ‘जी मुलगी आमच्या तावडीत सापडेल, तिला अशी वागणूक दिली जाईल’, हे जिहाद्यांनी आपल्याला दिलेले उघड आव्हान आहे. आजपर्यंत असे उघड आव्हान दिले जात नव्हते; परंतु आता ते मारून टाकतात. त्यांचे उघड आव्हान आहे की, त्यांच्या जाळ्यात फसलेली मुलगी धर्मांतर करण्यास सिद्ध नसेल, त्यांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते तिची अमानुषपणे हत्या करतील. ज्यामुळे त्यांच्या जाळ्यात सापडलेल्या बाकीच्या मुली घाबरतील आणि इस्लाम धर्म स्वीकार करतील. याच्या विरोधासाठी केंद्रस्तरावरील एका कायद्याची आवश्यकता आहे आणि या मोहिमेचा आरंभ आतापासून करायला पाहिजे. भाजपचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा आहे. हिंदु मुली आणि संस्कृती यांच्या विरोधात केलेला एक पूर्वनियोजित गुन्हा म्हणून याकडे बघितले गेले पाहिजे.

५. ‘ऑनलाईन’ खेळाच्या माध्यमातून शेकडो हिंदु मुलांचे इस्लाममध्ये धर्मांतर

अजून एक गोष्ट समोर आली आहे, ज्यात केवळ मुली नाही, तर मुलेही लव्ह जिहादचे लक्ष्य होत आहेत. सध्या आपली शिक्षणपद्धत अशी झाली आहे की, आपल्या मुलांना आंतरजाल (इंटरनेट) वापराची अनुमती द्यावीच लागते. ही आपली मोठी अडचण आहे. गाझियाबादमध्ये एक मुलगा खेळता खेळता ५ वेळेला नमाजपठण करू लागला. आपल्या कुटुंबातील मुले काय करत आहेत ? यात पालकांचेही तितकेच दायित्व आहे; कारण ते मुलांकडे लक्ष देत नाहीत. भ्रमणभाष संचावर इंटरनेट वापरायला दिल्यानंतर आपली मुले काय करत आहेत, हे ते बघत नाहीत. खेळतांना पद्धतशीरपणे त्यांना पहिल्या वेळेला पराजित केले जाते. त्यानंतर त्यांना सांगितले जाते, ‘तुम्ही कुराणातील आयते वाचले, तर जिंकू शकाल.’ ते जिंकले की, त्यांना सांगितले जाते, ‘तुम्ही इस्लाम स्वीकारा; कारण इस्लाम हा असा धर्म आहे, जो तुम्हाला जिंकण्याच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतो.’ यामध्ये ४०० मुले फसली. या प्रकरणी शाहनवाज मुंबईत पकडला गेला.

६. लव्ह जिहादविरोधात कठोर कायदा करण्याची केंद्र सरकारकडे आजच मागणी करा !

लव्ह जिहादच्या विरोधात कठोर केंद्रीय कायद्याची आवश्यकता आहे. त्या कायद्यानुसार जिहाद्यांना अशी काही शिक्षा झाली पाहिजे की, ती ऐकून त्यांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला पाहिजे. हिंदु मुली पुष्कळ लवकर लव्ह जिहादमध्ये फसल्या जातात. अशा अत्यंत नीच व्यक्तींना या देशात जगण्याचा मार्गच बंद झाला पाहिजे. केंद्र सरकारने एक असा कायदा संमत करायला पाहिजे, ज्यानुसार लव्ह जिहाद हा पूर्वनियोजित गुन्हा मानून नरपिशाच्चांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. असा कायदा लागू करण्याची मागणी केंद्र सरकारकडे आतापासूनच करायला पाहिजे.

आजच कायदा संमत केला, तरच मुली सुरक्षित होतील. त्यामुळे केंद्रस्तरावर कायदा झाला पाहिजे आणि तो प्रत्येक राज्यात लागू केला पाहिजे. आज हिंदु मुलींना मारले जाते आणि त्याचा प्रतिकार करण्यासाठी एकही आवाज उठत नाही, ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे ! त्यामुळे आपण सरकारकडे संवैधानिक रूपात केंद्रस्तरावरील किमान एक कायदा करण्याची मागणी तरी करू शकतो.’

– यति मां चेतनानंद सरस्वती, महंत, डासना पीठ, उत्तरप्रदेश.