भाईंदर (जिल्हा ठाणे) – येथील ऐतिहासिक घोडबंदर गडाच्या सुशोभीकरणाच्या वेळी तळघरात छुपी खोली आढळून आलीे. पुरातत्व विभागाने या खोलीची पहाणी केली.
मागील अनेक वर्षांपासून गडाची पडझड होत आहे. महानगरपालिकेने राज्य शासनाकडे घोडबंदर गड ‘महाराष्ट्र वैभव – राज्य संरक्षित स्मारक योजने’ अंतर्गत संगोपनार्थ देण्याची मागणी केली होती. शासनाने यास वर्ष २०१९ मध्ये संमती दिली होती. त्यानंतर संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले. मुख्य प्रवेशद्वाराजवळ कमानीसाठी खोदकाम करतांना विलक्षण भिंती असलेले तळघर कामगारांना दिसले.
प्रामुख्याने या खोलीचा वापर अडचणीच्या प्रसंगी स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी केला जात असल्याची चर्चा आहे. अशा अजून काही खोल्या सापडण्याची शक्यता लक्षात घेता येथे मातीचे उत्खनन केले जाणार असल्याचे पुरातत्व शास्त्रज्ञांनी सांगितले.