पिंपळेगुरव (पुणे) येथे पुरुषांनी वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाला घातले फेरे !

पिंपरी-चिंचवड (पुणे) – ‘वटपौर्णिमे’ला महिला वडाच्या झाडाला दोरा बांधून त्याची पूजा करतात, तसेच वटवृक्षाला फेर्‍या घालतात. या सणाला पिंपळे गुरव येथील पुरुषांनी ‘जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी’; म्हणून पत्नीसोबत वटवृक्षाला ७ फेरे घातले. वटवृक्षाला पुरुषांनी फेरे घालून स्त्री-पुरुष समानता असल्याचा संदेश देण्याचा उपक्रम ‘मानवी हक्क संरक्षण संस्थे’कडून राबवण्यात आला.

वटपौर्णिमा हा सण महिलांचा म्हणून ओळखला जातो. महिला जन्मोजन्मी हाच पती मिळावा; म्हणून या दिवशी वटवृक्षाला ७ फेरे घालून प्रार्थना करतात; परंतु या परंपरेला छेद देण्यासाठी काही पुरुष गेल्या १० वर्षांपासून वटवृक्षाला फेरे घालत आहेत.

संपादकीय भूमिका 

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे अशा कृती होत आहेत, यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे आवश्यक !