Pandit Dhirendra Krishna Shastri : हिंदु राष्ट्र निर्माण होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

बागेश्‍वर धामचे पीठाधीश्‍वर पंडित धीरेंद्र शास्त्री

अयोध्या – बागेश्‍वर धामचे महंत पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी नुकतीच अयोध्येला भेट दिली. अयोध्येत प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना ते म्हणाले, ‘‘श्रीराममंदिराप्रमाणेच काशी आणि मथुरा येथेही मंदिरे बांधली जातील. हिंदु राष्ट्र निर्माण होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.’’ हिंदुत्व ही एक सक्षम विचारधारा असून राष्ट्राची ओळख आहे. त्यामुळे ही विचारधारा प्रस्थापित करणे, हे आपले ध्येय आहे, असेही ते म्हणाले. अयोध्येतील लोकसभा निवडणुकीतील पराभवाविषयी बोलतांना पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री म्हणाले की, हिंदुत्वाचा कधीच पराभव होत नाही, हिंदुत्व शिकते. पराभवाला ते ‘शिकण्याची संधी’ मानतात.