शिवराज्याभिषेकदिन म्हणजेच हिंदवी स्वातंत्र्यदिन महोत्सव साजरा करा !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आवाहन

कोल्हापूर – ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी शके १५९६ या दिवशी पुण्यश्लोक शिवाजी महाराजांना वेदमंत्राच्या घोषात, सप्तसिंधु आणि सप्तनद्या यांच्या पवित्र जलांनी राज्याभिषेक करण्यात आला. या दिवशी शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे छत्रपती झाले. त्यामुळे हिंदूंनी शिवराज्याभिषेकदिन म्हणजेच हिंदवी स्वातंत्र्यदिन महोत्सव साजरा करणे आवश्यक आहे. या अंतर्गत २० जून या दिवशी सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्री शिवमूर्तीस अभिषेक करण्यात येईल. यानंतर सकाळी ९.१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून ‘देवदर्शन पदयात्रा’ चालू होईल. त्यासाठी सर्व हिंदु बांधवांनी सहपरिवार उपस्थित रहावे, असे आवाहन कोल्हापूर विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सांगलीत सायंकाळी ६ वाजता देवदर्शन पदयात्रा !

सांगली – सांगली शहरात सकाळी ६ वाजता शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस अभिषेक होईल. श्री शिवराज्यभिषेक दिनानिमित्त सांगलीत होणारी देवदर्शन पदयात्रा सायंकाळी ६ वाजता मारुति चौक येथून प्रारंभ होणार आहे. तेथून ही यात्रा हरभट रस्ता, टिळक चौक, बालाजी चौक, राजवाडा चौक, पंचमुखी मारुति रस्ता, बापटबालमार्गे परत मारुति चौक येथे येईल. तरी या यात्रेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विभागप्रमुख श्री. हणमंराव पवार यांनी केले आहे.