२१ जूनला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंत्रालयात करणार योगासने !

मुंबई – २१ जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या मंत्रालयाच्या प्रांगणात सकाळी ८.३० वाजता योगासन शिबिराचे आयोजन केले आहे. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री आणि अधिकारी-कर्मचारी योगासने करतील.

योगाभ्यास आणि योगा यांची संपूर्ण पद्धत ठाऊक व्हावी, यासाठी जागतिक योग दिनाच्या निमित्ताने मंत्रालयात योगासन शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.