Jharkhand Muslims Attack Hindus : पाकूर (झारखंड) येथे बकरी ईदच्या दिवशी मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण !

गोहत्या केल्याचा हिंदूंनी आरोप केल्यावर झाले आक्रमण !

पाकूर (झारखंड) – येथे बकरी ईदच्या दिवशी मुसलमानांनी गोहत्या केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केल्यावर मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केले. त्यांनी हिंदूंच्या घरांची तोडफोड केली, तसेच गावठी बाँबही फोडले. हा हिंसाचार झारखंडला लागून असलेल्या बंगालच्या सीमेवरील गावातून बोलावण्यात आलेल्या मुसलमानांनी केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

१. येथील गोपीनाथपूर भागात बकरी ईदच्या दिवशी एका भूमीवर गोहत्या केली जात असतांना या भूमीच्या मालकाने त्याला विरोध केला. त्यामुळे मुसलमान संतप्त झाले आणि त्यांनी शेजारील बंगाल राज्यातील गावातून मुसलमानांना बोलावून हिंदूंवर आक्रमण केले.
त्यांनी हिंदूंवर दगडफेक करत गावठी बाँब फोडले, तसेच काही घरांची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच बंगाल आणि झारखंड दोन्ही राज्यांचे पोलीस तेथे पोचले अन् त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

२. पोलिसांनी सांगितले की, हे प्रकरण २ गावांमधील भांडणाचे आहे. एक गाव झारखंडमध्ये आहे, तर दुसरे बंगालमध्ये आहे. या दोघांच्या मध्ये कालवा आहे.

घुसखोरांकडून आदिवासींच्या भूमी बळकावून महिलांवर बलात्कार केले जात आहेत ! – भाजप

या घटनेविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना झारखंडमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी म्हणाले, ‘‘राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. राज्यातील सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार घुसखोरांवर कारवाई करत नाही. या भागात घुसखोरांचा कहर झाला आहे. ते आदिवासींच्या भूमी बळकावत असून महिलांवर बलात्कार करत आहेत. स्थानिक लोकांच्या संपत्तीवर अधिकार सांगत आहेत. एवढे होऊनही तरीही सरकार गप्प आहे.’’

संपादकीय भूमिका

  • बकरी ईदच्या दिवशी बकर्‍याचा बळी देण्याची परंपरा असतांना गोहत्या का केली जाते ?
  • हिंदूंना डिवचण्यासाठीच असे प्रकर केले जात आहेत, हे आत्मघातकी धर्मनिरपेक्षता जोपासणार्‍या हिंदूंना कधी लक्षात येणार ?