नर्‍हे (पुणे) येथून १ कोटी ४० लाख रुपयांचा गुटखा जप्त

४ जणांना अटक, १ जण पसार

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – नर्‍हे परिसरातील खाडेवाडीमधील एका गोडाऊनमधून (साठवण केंद्रामधून) १ कोटी ४० लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. (गुटखा बंदीची ऐशीतैशी ! – संपादक) या प्रकरणी पुष्पेंद्र अकबाल, सुनील सिंह, मुकेश गेहलोत आणि चंदन सिंह यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींचा साथीदार नीलेश ललवानी याच्यावर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून तो पसार झाला आहे. ही कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली आहे. जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये काही कच्चा मालसुद्धा आहे. त्यामुळे आरोपी येथे गुटखा सिद्ध करत असल्याचाही संशय आहे. या प्रकरणी येथून पोलिसांना काही पुरावे मिळाले असून याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.