Nagpur Accident : नागपूर येथे भरधाव चारचाकीखाली चिरडून दोघांचा मृत्यू, ७ जण गंभीर घायाळ !


नागपूर – येथे एका भरधाव चारचाकीनेे पदपथावर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर ७ जण गंभीर घायाळ झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. चालक फरार झाला होता. या प्रकरणी भूषण लांजेवार या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली.

चारचाकी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती पदपथावर चढली. तेथे मातीची भांडी विकणारे बंजारा कुटुंब झोपलेले होते. या कुटुंबात ३ महिला, ४ मुले आणि १ पुरुष असे नऊ जण होते. या नऊ जणांच्या अंगावरून गाडी गेली.