Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगडमध्ये पोलीस चकमकीत ८ नक्षलवादी ठार

प्रातिनिधिक छायाचित्र

जगदलपूर (छत्तीसगड) – छत्तीसगडमधील अबुझमाड येथील कुतुल भागात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ८ नक्षलवादी ठार झाले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या चकमकीत एका पोलिसाला वीरगती प्राप्त झाली आहे, तर २ पोलीस घायाळ झाले आहेत. यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत १४१ नक्षलवाद्यांना ठार मारले आहे.