Jaish-e-Mohammed Threat For Ram Mandir : जिहादी आतंकवाद्यांकडून श्रीराममंदिर उडवून देण्याच्या धमकीनंतर अयोध्येच्या सुरक्षेत वाढ !

अयोध्या – ‘जैश-ए-महंमद’ या आतंकवादी संघटनेने श्रीराममंदिर उडवून देण्याची धमकी दिल्यानंतर अयोध्येच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. महर्षि वाल्मीकि विमानतळावरील सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजकरण नय्यर यांनी १४ जून या दिवशी महर्षि वाल्मीकि विमानतळाला भेट देऊन सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला. पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तर देतांना ते म्हणाले की, अयोध्या धामची सुरक्षा आधीच कडेकोट आहे. आता त्यात आणखी वाढ करण्यात आली आहे. वेगवेगळ्या भागांत वरिष्ठ राजपत्रित पोलीस अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली पथके सिद्ध करण्यात आली आहेत. याखेरीज विविध विभागांमध्ये विशेष सशस्त्र पोलीस दलाचे सैनिक तैनात करण्यात आले आहेत. महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षाव्यवस्थेवरही २४ घंटे लक्ष ठेवले जात आहे. श्रीरामजन्मभूमी संकुलात तैनात अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी यांना सतर्क करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

अशी धमकी देण्याचे कुणाचे धाडस होणार नाही, अशी पत सरकारने निर्माण करणे आवश्यक !