आरती परम पूज्य गुरुदेवांची ।

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रति उत्कट भाव असणारे घाटकोपर, मुंबई येथील श्री. बबन गेणभाऊ वाळुंज (वय ६३ वर्षे) यांना त्यांच्याविषयी सुचलेली आरती येथे देत आहोत.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

जय देव जय देव । जय श्री जयंतदेवा (टीप) ।
ओवाळितो आरती । हरपली भवचिंता ।। धृ ।।

श्री. बबन वाळुंज

आठविता तुला विसरलो मीपणा ।
दयाळू, कृपाळू दयेच्या सागरा ।
साधकांचा कैवारी, षड्रिपू संहारी ।
दोष-अहं निर्दाळी, भक्ता ठेवी चरणांसी ।। १ ।।

गुरु, सद्गुरु, गुरुदेव तूची ।
मेरुमणी तू आहे सप्तलोकांचा ।
स्वामी तू भावाचा भुकेला रे ।
निर्गुणात असता सगुणात येसी रे ।। २ ।।

गुरूंचा गुरुदेव, देव परात्पर ।
श्रीमन्नारायण महाविष्णूचा अवतार ।
प्रल्हादा संकट पडता जड भारी ।
धावे तू सत्वर ब्रिदासाठी ।। ३ ।।

सहस्रार्जुन क्षत्रिय मातले ।
अवतार घेतलास परशुरामाचा ।
निर्दाळी दुष्ट बहुजन ।
साधकांसी दिले अभयदान ।। ४ ।।

ऋषी नारद नारायण नारायण ।
पापी वाल्या ते वाल्मीकि ।
तरले रामनामे ।
त्रेतायुगी तू दिले तयांसी थोरपण ।। ५ ।।

कंस, शिशुपाल, कौरव, बकासुर ।
नाम तुझे घेता कापती थरथर ।
पांडवांचा सखा, द्रौपदीचा दाता ।
कर्ता-अकर्ता अर्जुनाचा सारथी ।। ६ ।।

कलियुगांतर्गत कलियुगी श्री जयंत गुरुदेव ।
अंतर्बाह्य देह करितो तू निर्मळ ।
परम पूज्य गुरुदेव, तूच परमेश्वर ।
कलियुगी अवतार विष्णुनारायण ।। ७ ।।

श्रीधर, महादेव, तू जयंतदेव ।
गुरुदेव तुझे भक्तराज महाराज, दिधला आशीर्वाद ।
जगत् कल्याणासाठी ग्रंथ संकलक तूच गुरुदेव ।
कर्ता-करविता, नामा तू निराळा ।। ८  ।।

चैतन्याचा जिव्हाळा, साधकांचा आत्मा ।
संतांचा परमात्मा सखा पांडुरंग ।
मेळविली मांदियाळी संत महात्म्यांची ।
स्थापना तू करितो ईश्वरी राज्याची ॥ ९ ॥

जय जयंत माता, श्री जयंत पिता ।
बंधू-भगिनी तूची गुरुदेवा ।
सगुण त्रिगुण गुणातीत निर्गुण ।
साधकांचे ध्येय गुरुकृपायोग ।। १० ।।

जय देव जय देव जय श्री जयंतदेवा ।
जय देव जय देव जय श्री जयंतदेवा ।
ओवाळितो आरती हरपली भवचिंता ।
जय देव जय देव जय श्री जयंतदेवा ।। ११ ।।

टीप : परात्पर गुरु डॉ. आठवले

– श्री. बबन गेणभाऊ वाळुंज (वय ६३ वर्षे), घाटकोपर, मुंबई

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक