‘भूमी जिहाद’च्या विरोधात लढा देण्याची आवश्यकता !

२४ जून २०२४ या दिवशीपासून श्री रामनाथ देवस्थान, गोवा येथे चालू होत असलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या निमित्ताने…

१. ‘जिहाद’ म्हणजे काय ?

हिंदु, ख्रिस्ती, बौद्ध अथवा जैन यांच्या धार्मिक ग्रंथांमध्ये ‘जिहाद’ शब्दाचा संदर्भ नाही. त्याचा संदर्भ मुसलमानांच्या कुराण, सुरा, हदित, फतवा, तसेच औरंगजेबाने लिहिलेल्या आलमगिरी या ग्रंथांमध्ये आढळून येतो. ‘जिहाद’ या शब्दाचा अर्थ संघर्ष अथवा लढा असा आहे. हा संघर्ष देशातील शेतकर्‍यांचे हित, विद्यार्थ्यांचे कल्याण अथवा समाजातील इतर गटांच्या कल्याणासाठी करण्यात येणारा संघर्ष नाही, तर तो इस्लाम इस्लामसाठी करत असलेला संघर्ष आहे आणि हे कटू सत्य आहे.

२. प्राचीन काळापासून ‘भूमी जिहाद’ विचारसरणी कार्यरत

‘भूमी जिहाद’ (लँड जिहाद) ही संकल्पना भारतियांसाठी नवीन नाही. ही संकल्पना ‘लव्ह जिहाद’ आणि ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून करण्यात येणारा ‘आर्थिक जिहाद’ या संकल्पनेहून पुरातन आहे. भारतातील मुसलमान प्राचीन काळापासून ‘भूमी जिहाद’चा उपयोग करत आले आहेत. अयोध्येतील श्रीराममंदिर तोडून तेथे बांधलेली बाबरी, ज्ञानवापी मंदिर पाडून तेथे मशीद असल्याचा दावा, मथुरेतील श्रीकृष्ण मंदिराच्या भिंती पाडून बांधलेली मशीद, तसेच श्रीरंगपट्टणम् (मंड्या, कर्नाटक) येथील हनुमान मंदिर नष्ट करून त्यावर बांधलेली मशीद ही ‘भूमी जिहाद’ची उदाहरणे आहेत. कर्नाटकमधील मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टणम् येथे हनुमान मंदिर अतिशय भव्य-दिव्य होते. एकदा टिपू लहान असतांना खेळत होता. त्या वेळी तेथे एक फकीर आला आणि त्याने टिपूला ‘तू मोठा होशील, तेव्हा हे मंदिर पाडून तेथे मशीद बांध’, असे सांगितले. वर्ष १७८२ मध्ये हैदर अलीच्या मृत्यूनंतर सत्ता हातात आल्यावर टिपूने सर्वप्रथम हे मंदिर पाडून तेथे मशीद बांधली.  आमच्याकडे माहिती अधिकाराच्या कायद्यानुसार गोळा केलेली सर्व कागदपत्रे आहेत, तसेच शासकीय राजपत्रकातील नोंदी आहेत, ज्यांत असे स्पष्ट नमूद केले आहे की, या मशिदीच्या ठिकाणी पूर्वी हनुमान मंदिर होते. अशी अनेक ‘भूमी जिहाद’ची उदाहरणे भारतभरात दिसून येतील.

श्री. एस्. भास्करन्

३. ‘भूमी जिहाद’च्या विरोधात भारतातील लढ्याचे स्वरूप

प्रथम बेंगळुरू येथील चामराजपेठ मैदानाचे उदाहरण पाहूया. वर्ष १८९१ पासून आजतागायत या मैदानात ईदगाहची (ईदगाह म्हणजे नमाज पठणाची जागा) इमारत अस्तित्वात आहे. ईदगाहसाठी पर्यायी जागा देण्यात आली असून ती सध्याच्या ईदगाहपासून ४०० ते ५०० मीटर अंतरावर आहे, तसेच त्यांना दफनभूमीसाठीही पर्यायी भूमी दिली आहे. वर्ष १९६४ मध्ये सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यात म्हटले आहे, ‘ईदगाहला पर्यायी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सध्या असलेली इमारत पाडून ती जागा बेंगळुरू महानगरपालिकेच्या कह्यात द्यावी.’ असे असूनही मुसलमान समाज अजूनही या मैदानात प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी राष्ट्रीय ध्वज फडकवू देत नाही, तसेच कोणतेही हिंदु सण अथवा सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करू देत नाही.

या मैदानाविषयी माहिती अधिकाराच्या कायद्याखाली याचिका केल्यावर काही विचित्र आणि आश्चर्यकारक तथ्ये समोर आली. बेंगळुरू महानगरपालिकेने त्यांच्याकडे उपलब्ध कागदपत्रांद्वारे हे ईदगाह मैदान नसून ते बेंगळुरू महानगरपालिकेचे सार्वजनिक मैदान असल्याचे सांगितले. याचा अर्थ या भूमीची मालकी बेंगळुरू महानगरपालिकेकडे असल्याचे स्पष्ट होते. ही कागदपत्रे माझ्या कह्यात आल्यावर मी ती महापालिकचे मुख्य आयुक्त आणि सहआयुक्त यांना सादर केली, तसेच या मैदानात देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याविषयी निवेदन दिले आणि राष्ट्रीय ध्वज फडकावण्याविषयी अनुमती मागितली. त्यावर कर्नाटक वक्फ बोर्ड आणि कर्नाटकातील केंद्रीय मुस्लीम संघटना ही भूमी त्यांची असल्याचा दावा करू लागल्या.

त्यानंतर बेंगळुरू महानगरपालिकेचे आयुक्त आणि विभागीय आयुक्त यांनी एक पत्रकार परिषद बोलावली. त्यात त्यांनी हे मैदान शासकीय भूमी असल्याचे सांगितले. या मैदानात राष्ट्रीय ध्वज लावण्यासाठी वक्फ बोर्डाचा विरोध होता. या पत्रकार परिषदेमुळे ही भूमी शासकीय असल्याचे सिद्ध झाले. या लढ्याला आलेल्या यशामुळे आम्ही १५ ऑगस्टला या मैदानात ध्वजवंदन करण्याचे ठरवले.

४. चामराजपेट येथे मुसलमानांकडून हिंदु स्मशानभूमीवर अतिक्रमण

बेंगळुरू शहराच्या मध्यभागी चामराजपेट हा विधानसभा मतदारसंघ आहे. तेथून जमीर अहमद खान हे सलग ४ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. या उपविभागात हिंदूंच्या ४ दफनभूमी आहेत. त्यांपैकी २ कानडी लोकांच्या अाणि १ तमिळी हिंदूंची आहे अन् एक सर्व हिंदूंसाठी आहे. वर्ष २०११ ते २०१९ या कालावधीत तेथे ५ सहस्र ८०० लोकांचे दफनविधी झाले. काही कारणांनी या भागातील मुसलमान नगरसेवक आणि आमदार यांनी मिळून या दफनभूमीतील ३ सहस्र समाधी खोदून काढल्या आणि त्या शहराबाहेरील विविध ठिकाणी नेऊन टाकल्या, तसेच काही पूर्णतः नष्ट केल्या. हे लक्षात आल्यावर आम्ही माहिती अधिकाराच्या कायद्याच्या साहाय्याने बेंगळुरू महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी, आरोग्य आणि महसूल विभागांशी पत्रव्यवहार केला आणि तेथे दफन करण्यात आलेल्या मृतदेहांचा आकडा विचारला. त्यांच्याकडून आलेल्या माहितीनुसार हा आकडा अगदी ५ सहस्र ८०० हून अधिक होता.

५. भारतभरातील मुसलमानांचा तीन सूत्री कार्यक्रम

‘हे लोक असे का वागतात ?’, याचा विचार केल्यावर याचे एकच कारण लक्षात येईल आणि ते म्हणजे, हिंदूंमध्ये संघर्ष करण्याची वृत्ती नाही. संपूर्ण भारतातील कुठलेही मुसलमान असोत, ते ‘दार उल् इस्लाम’ (जेथे इस्लामचे शासन चालते असा प्रदेश), ‘दार उल् हरब’ (युद्धभूमी. जेथे इस्लामचे शासन चालत नाही असा प्रदेश) आणि ‘दार उल् अमन’ (शांतता प्रदेश, जिथे लढाई आणि भांडणे होत नाहीत) या ३ सूत्रांनुसार कार्य करतात. मुसलमान बहुसंख्यांक असतात, तेव्हा ते ‘दार उल् इस्लाम’च्या नियमाप्रमाणे वागतात आणि इतर धर्मियांना त्यांची कोणतीही धार्मिक कृती करू देत नाहीत. ‘दार उल् इस्लाम’च्या भूमीलगतच्या भूमी या ‘दार उल् हरब’ भूमी म्हणून ओळखल्या जातात आणि त्यांना भविष्यात ‘इस्लामिक स्टेट’ बनवले जाते.  शेवटचे ‘दार उल् अमन’ या विचारसरणीनुसार सध्या भारतात कार्य चालू आहे.  जेव्हा हिंदूंच्या तुलनेत मुसलमान बहुसंख्य नसतात, तेव्हा ‘अमन’नुसार कार्य केले जाते. तेव्हा ते आरक्षण आणि वक्फ बोर्डाची भूमी यांची मागणी करतात, तसेच सर्व प्रकारच्या समाजविघातक कारवाया करतात.

६. माहिती अधिकार कायद्याचा हिंदूंच्या कल्याणासाठी उपयोग करणे आवश्यक !

आपल्याकडे ‘माहिती अधिकार कायदा २००५’ नावाचा एक कायदा आहे. याच्या साहाय्याने आवश्यक ती सर्व कागदपत्रे सिद्ध करून आपल्याला ‘भूमी जिहाद’शी लढा द्यायचा आहे. ‘ज्ञानात शक्ती आहे’, असे स्वामी विवेकानंद म्हणत असत; मात्र सद्यःस्थितीत ‘माहिती हीच संपत्ती आणि शक्ती’ आहे. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी अशा विषयात लढा देतांना प्रथम ‘माहिती अधिकार कायदा २००५’ विचारांत घेऊन त्याच्या साहाय्याने आवश्यक कागदपत्रे गोळा करावीत आणि हिंदु समाजाच्या कल्याणासाठी मोठ्या प्रमाणात लढा द्यावा.’

– श्री. एस्. भास्करन्, अध्यक्ष, विश्व सनातन परिषद, बेंगळुरू.