धार्मिक ग्रंथ जाळून त्याद्वारे अनादर करणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा नोंद करा ! – लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार

पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगट्टे यांना तक्रार देतांना उजवीकडे संदीप सासण, तसेच उपस्थित अन्य हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर – शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे सहकारी यांनी २९ मे या दिवशी चवदार तळे, महाड येथे पूर्वग्रहदूषितपणे भाषण करून ‘मनुस्मृति’ हा पवित्र ग्रंथ फाडून त्याचा अवमान केला. यानंतर अयोग्य हावभाव करून ती जाळण्यात आली. एक श्रद्धावान हिंदू म्हणून माझ्या धार्मिक भावना दुखावल्या असून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर धार्मिक ग्रंथ, पोस्टर जाळून त्याद्वारे अनादर केलेल्या अवैध कृत्यांविषयी गुन्हा नोंद करावा, या मागणीची तक्रार अखिल भारत हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासणे यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली. ही तक्रार प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगट्टे यांनी स्वीकारली.


या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री. सुनील सामंत, महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष श्री. निरंजन शिंदे, सर्वश्री अर्जुन आंबी, योगेश केरकर, राज पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.