बसमधून प्रवास करणार्‍या हिंदु तरुणीशी असभ्य वर्तन करणार्‍या अन्य धर्मीय तरुणाला चोपले !

असभ्य वर्तन करणारा तरुण

मंगळुरू (कर्नाटक) – येथे बसमधून प्रवास करत असतांना एका हिंदु तरुणीशी अन्य धर्मीय युवकाने असभ्य वर्तन केल्याची घटना घडली. या तरुणीने तिच्या समवेत असणार्‍या नातेवाइकांना याची माहिती दिल्यावर त्यांनी बस बल्लाळ येथे थांबवली. त्यांनी या तरुणाला बसमधून खाली उतरवून चोप दिला आणि नंतर पोलिसांच्या कह्यात दिले. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.