Sajid Tarar On Modi : पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व भारताची स्थिरता आणि भविष्य यांची हमी आहे ! –  पाकिस्तानी वंशाचे अमेरिकन उद्योगपती साजिद तरार

साजिद तरार व नरेंद्र मोदी

वॉशिंग्टन – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण दक्षिण आशिया प्रदेशातील स्थिरतेची हमी आहेत. मोदी यांचे नेतृत्व भारताच्या स्थिरतेची आणि भविष्याची हमी आहे, असे विधान पाकिस्तानी वंशाचे अमेरिकन व्यावसायिक साजिद तरार यांनी केले. भारतातील सार्वत्रिक निवडणुका यशस्वीपणे पार पडल्याविषयी अभिनंदन करतांना साजिद तरार म्हणाले की, भारतीय लोकशाहीच्या ताकदीचा हा पुरावा आहे. भारताची लोकशाही अमेरिकेपेक्षा मजबूत आहे, असेही ते म्हणाले.