ठाणे – कोपर दिवा स्थानकादरम्यान एका तरुणाचा लोकलगाडीतील गर्दीमुळे खाली पडून मृत्यू झाला. केऊर सावळा असे त्याचे नाव आहे. तो लोकलगाडीतून खाली पडल्यावर त्याला बेशुद्धावस्थेत टेंपोने रुग्णालयात नेण्यात आले. या वेळी रेल्वे प्रशासनाची रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. ती मिळाली असती, तर प्रवाशाचा जीव वाचला असता, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. (रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार ! – संपादक)