कोल्हापूर येथे आज एक दिवसाचे ज्योतिष संमेलन !

कोल्हापूर – अखिल भारत हिंदु महासभा, मराठा क्रांती चॅनेल, श्री प्रल्हाद दिनानाथ कारीकर सराफी दुकान, शारदा खाडे ज्योतिष मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ९ जून या दिवशी स्वामी विवेकानंद आश्रम हॉल, मंगळवार पेठ या ठिकाणी एक दिवसीय ज्योतिष संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ज्योतिषाचार्य श्री. विलास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणारे हे संमेलन सकाळी १० वाजता चालू होईल. या संमेलनात विविध मान्यवरांची भाषणे होतील. तरी त्यासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अखिल भारत हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासणे यांनी केले आहे.